नांदेडच्या पोलीस कर्मचाऱ्याला सलाम! सेवानिवृत्तीनंतर मोफत करताहेत ‘ड्युटी’
नांदेडचे निवृत्त पोलीस कर्मचारी शेख अब्दुल शेख अमीर यांची ही कहाणी आहे. निवृत्तीनंतर गेल्या तीन वर्षांपासून नांदेडचे वाहतूक सुरळीत करण्याचे काम ते करत आहेत.
ADVERTISEMENT
सरकारी कर्मचारी सेवानिवृत्तीनंतर पुढील आयुष्य सुखाने जगण्याचा विचार करतात. काही क्वचितच असतात जे काहीतरी नवं करण्याचा किंवा शिकण्याचा प्रयत्न करतात. असेच एक अवलिया आहेत. ज्यांनी सेवानिवृत्तीनंतर चांगला निर्धार केला आणि ते करूनही दाखवत आहेत. ते केवळ नावानेच अमीर नसून मनानेही आहेत. नांदेडचे निवृत्त पोलीस कर्मचारी शेख अब्दुल शेख अमीर यांची ही कहाणी आहे. निवृत्तीनंतर गेल्या तीन वर्षांपासून नांदेडचे वाहतूक सुरळीत करण्याचे काम ते करत आहेत.
ADVERTISEMENT
शेख अब्दुल शेख अमीर म्हणतात की, ‘मी माझ्या कामातून मुक्त झालो असलो तरी, कर्तव्यातून मुक्त झालो नाही.’ त्यांनी पोलीस दलात 25 वर्ष काम केलं आहे. 2020 साली ते पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झाले. तरी सुद्धा शेख हे घरी न बसता दररोज शहरातील कोणता ही चौक असो त्या ठिकाणी जाऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी दिवसातून चार तास वेळ काढून सेवा करतात.
गुणरत्न सदावर्तेंना राजकारण भोवलं; दोन वर्ष करता येणार नाही वकिली
नांदेड येथील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी शेख अब्दुल शेख अमीर हे पोलीस खात्यात सेवेत असताना उन असो की, पाऊस याची तमा न बाळगता वाहतूक सुरळीत करण्यासाठी नेहमी तत्पर राहायचे. कर्तव्यावर असताना कधी एक क्षणही खाली न बसणारा जबाबदार कर्मचारी म्हणून ते नांदेड शहरात प्रसिद्ध आहेत. पोलीस खात्यातून तीन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले असले तरी शेख अमीर दररोज न चुकता चार तास नि:शुल्क नांदेड च्या रस्त्यांवर वाहतूक सुरळीत करण्याचे काम करतात.
हे वाचलं का?
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे प्रवास महागणार, टोलमध्ये तब्बल 18 टक्के वाढ
त्यांची सेवाभावी वृत्ती पाहून त्यांना पोलीस खात्यातून वाहतूक शाखेची वर्दी परिधान करण्याची परवानगी देण्यात आली आहे. माणूस काम करून कधीच मरत नाही तर काम न केल्याने माणूस मरतो अशी त्यांची विचारदारणा आहे. त्यामुळे प्रत्येकाने बळ आहे तोपर्यंत कर्तव्य पार पाडावे असा संदेश ते देतात.
शेख अमीर यांना दोन मुली एक मुलगा आहे. ते सद्या शिक्षण घेत आहे. त्यांना रहाण्यासाठी स्वतःचं घर नाही शेती नाही शेख भाड्याच्या घरात राहतात. पोलीस दलाच्या पेट्रोल पंपवर ही दररोज तीन ते चार तास निशुल्क सेवा करतात. यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.
ADVERTISEMENT
Savarkar row: शरद पवार उद्धव ठाकरेंच्या बाजूने, राहुल गांधींना सुनावलं!
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT