धनुष्यबाण चिन्ह गोठवलं! शरद पवारांचं निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मोठं विधान, म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिंदे-ठाकरेतील राजकीय संघर्ष आता शिगेला पोहोचलाय. शिंदेंनी निवडणूक आयोगात पुन्हा अर्ज केल्यानंतर आयोगानं अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह गोठवलं. या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या असून, शरद पवारांनी महत्त्वाचं भाष्य केलंय.

ADVERTISEMENT

निवडणूक आयोगाच्या निर्णयावर औरंगाबाद येथे माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, “हल्ली निर्णय हे गुणवत्तेवरच घेतले जातील, याची खात्री हल्ली देता येत नाही. जे गेले काही दिवस वाटत होतं, ते घडलं”, असं म्हणत शरद पवारांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर शंका उपस्थित केलीये.

हे पूर्व नियोजित होतं असं वाटतं का? त्यावर पवार म्हणाले, “माझ्याकडे काही माहिती नाही. पण असं घडेल, असं मला माझं मन सांगत होतं. इथून पुढे निवडणुकांना सामोरं जायचं असेल आणि शक्तीशाली एखादी संघटना असेल, तर ती जे ठरवले, ते चिन्ह शेवटपर्यंत टिकेलच असं सांगता येणार नाही. त्यामुळे चिन्ह असो अथवा नसो, निवडणुकीला सामोरं जायची तयारी ठेवली पाहिजे”, असा सल्ला पवारांनी ठाकरेंना दिला.

हे वाचलं का?

शिवसेनेकडे आता पर्याय काय?; शरद पवारांनी दिलं उत्तर

शिवसेनेकडे पर्याय काय दिसतोय, या मुद्द्यावर शरद पवार म्हणाले, “नवीन चिन्ह घ्यायचं आणि निवडणूक लढवायची. मी जेव्हा निवडणूक लढलो तेव्हा बैलजोडी चिन्हावर लढलो. दुसरी निवडणूक लढलो चिन्ह होतं गाय वासरू. तिसऱ्या निवडणुकीत चिन्ह होतं, चरखा. चौथी निवडणूक पंजा चिन्हावर लढलो आणि आता घड्याळ चिन्ह. अशा वेगवेगळ्या चिन्हांवर मी स्वतः लढलोय. याचा काही परिणाम होत नाही. लोक ठरवतात”, अशी भूमिका पवारांनी मांडली.

shiv sena symbol freeze : निवडणूक आयोग आमचा बाप नाहीये, तो केंद्राचा वेठबिगार; अरविंद सावंत भडकले

ADVERTISEMENT

शिवसेना संपणार नाही, उलट जोमाने वाढेल

या सगळ्यांमुळे शिवसेना संपेल असं म्हटलं जातंय, तुम्ही याकडे कसं बघता? असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, ‘अजिबात संपणार नाहीये. उलट अधिक जोमाने वाढेल. ही जी तरुण पिढी आहे, ती जिद्दीने उतरेल आणि आपली शक्ती वाढवेल.’

ADVERTISEMENT

महाविकास आघाडी राहणार का?; पवारांनी स्पष्ट केली भूमिका

महाविकास आघाडीवर परिणाम होणार का? या प्रश्नावरही पवारांनी भूमिका मांडली. ‘काहीच कारण नाहीये. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे. शिवसेना… उद्धव ठाकरे गट शिवसेना आणि राष्ट्रवादी आहे. आणि हे कायम एकत्र राहतील यात काही शंका नाहीये. आता जी पोटनिवडणूक आहे, त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे”, असं भाष्य पवारांनी यावेळी केलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT