Sharad Pawar : ‘मुंबईत येऊन जीव घेईन’; शरद पवारांना कुणी दिली जीवे मारण्याची धमकी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आलीये. शरद पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी फोन करून धमकी देण्यात आलीये. मुंबईत येऊन हत्या करेन, अशी धमकी मिळाली असून, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

ADVERTISEMENT

राजकीय वर्तुळातून खळबळजनक माहिती समोर आलीये. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना गावठी बंदुकीने हत्या करण्याची धमकी देण्यात आलीये. शरद पवार यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक येथे अज्ञात व्यक्तीने फोन करून जिवे मारण्याची धमकी दिलीये.

शिंदे-फडणवीसांनी PM मोदींसमोर केलेला दावा पवारांनी एका वाक्यात खोडला!

हे वाचलं का?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांच्या मुंबईतल्या घरी म्हणजे सिल्व्हर ओके येथे फोन आला होता. फोनवरून समोरील व्यक्तीने पवारांची हत्या करण्याची धमकी दिली. मुंबईत येऊन गावठी कट्ट्याने शरद पवारांना जीवे मारू, अशी धमकी अज्ञात व्यक्तीने दिलीये.

शरद पवारांचे PM मोदींना खडे बोल : नागपूरच्या भाषणावरुन ‘शहाणपणा’चा सल्लाही दिला…

ADVERTISEMENT

ज्या व्यक्तीने धमकी दिली, ती व्यक्ती हिंदीतून बोलत होती. धमकीचा फोन आल्यानंतर या प्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आली. गावदेवी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 294, 506(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस प्रकरणाच तपास करत आहेत.

ADVERTISEMENT

शरद पवारांना धमकी देणारी व्यक्ती कोण?

तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करत धमकी देणाऱ्याला ताब्यात घेतलं. मुंबई पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवारांना धमकी देणारी व्यक्ती बिहारची रहिवाशी आहे. मागील 2 ते 3 महिन्यांपासून तो फोन करून धमकी देत होता. शरद पवारांना धमकी देणाऱ्याला बिहारला जाऊन मुंबई पोलीस ताब्यात घेणार आहेत आणि त्यानंतर त्याला मुंबईला घेऊन येणार आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT