खळबळजनक! शरद पवारांच्या आवाजात अधिकाऱ्याला फोन; पण ‘सिल्व्हर ओक’वर कॉल आला अन्…
अमूक मंत्र्यांच्या वा आमदाराचा पीए बोलतोय… असं म्हणत पैसे उकळणारे अनेक घटना आतापर्यंत आपण ऐकल्या असतील, पण शरद पवारांच्याच नावाने ब्लॅकमेलिंग केल्याचं ऐकलंय का? पण अशी घटना गुरुवारी समोर आली. शरद पवार बोलत असल्याचं म्हणत एका व्यक्तीने चक्क मंत्रालयातील व्यक्तीला फोन केला आणि बदलीसंदर्भात त्याच्यावर दबाव टाकल्याच्या घटनेनं चांगलीच खळबळ उडाली. आरोपीनं शरद पवारांच्याच्या आवाजाची […]
ADVERTISEMENT
अमूक मंत्र्यांच्या वा आमदाराचा पीए बोलतोय… असं म्हणत पैसे उकळणारे अनेक घटना आतापर्यंत आपण ऐकल्या असतील, पण शरद पवारांच्याच नावाने ब्लॅकमेलिंग केल्याचं ऐकलंय का? पण अशी घटना गुरुवारी समोर आली. शरद पवार बोलत असल्याचं म्हणत एका व्यक्तीने चक्क मंत्रालयातील व्यक्तीला फोन केला आणि बदलीसंदर्भात त्याच्यावर दबाव टाकल्याच्या घटनेनं चांगलीच खळबळ उडाली. आरोपीनं शरद पवारांच्याच्या आवाजाची नक्कल केल्याच्या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू होती.
ADVERTISEMENT
मंत्रालयात कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याला बुधवारी एक कॉल आला. या कॉलवरून दोन व्यक्तीनं संवाद साधला. शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावरून बोलत असल्याचं आरोपींनी अधिकाऱ्याला सांगितलं. त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीने शरद पवार बोलत असल्याचं सांगत हुबेहुब त्यांच्या आवाजात संवाद साधला.
या व्यक्तींनी शरद पवार यांच्या आवाजात बदलीसंदर्भात बोलल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, कॉल येऊन गेल्यानंतर अधिकाऱ्याला संशय आला. त्यानंतर त्यांनी शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर फोन करून आलेल्या कॉलबद्दल विचारणा केली. त्यावर असा कोणताही कॉल सिल्व्हर ओकवरून करण्यात आलेला नसल्याचं आणि शरद पवारांसह कुणीही कॉल केला नसल्याचंही सांगण्यात आलं.
हे वाचलं का?
त्यानंतर शरद पवारांच्या सुरक्षा रक्षकाने गावदेवी पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली. आलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला. काही तासांतच शरद पवारांच्या आवाजात केल्या प्रकरणावरील पडदा दूर झाला. मुंबई गुन्हा शाखा पोलिसांच्या खंडणीविरोधी सेलने कोणत्या ठिकाणाहून कॉल याबद्दल तपास केला. कॉल ट्रेस केल्यानंतर पुणे जिल्ह्यातील जेऊर येथून कॉल करण्यात आल्याचं समोर आलं. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, खंडणी विरोधी सेलकडून त्यांची चौकशी केली जात आहे.
‘शरद पवारांच्या नावे फोन करणं निंदनीय’
ADVERTISEMENT
शरद पवारांच्या आवाजाची नक्कल करून मंत्रालयात फोन केल्याचा प्रकार दुर्दैवी असल्याचं राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे.’जो प्रकार घडला आहे, तो अत्यंत निंदनीय आहे. कुणी शरद पवार यांचा आवाज काढून काम करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यांच्यावर कार्यवाही झालीच पाहिजेत’,असं ते म्हणाले. हिंगोली येथे व्हेंटिलेटर्स लोकार्पण कार्यक्रमासाठी ते आले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT