‘आम्ही नजर ठेवून आहोत…’, शरद पवारांच्या राजीनाम्यावर फडणवीस असं का म्हणाले?

योगेश पांडे

ADVERTISEMENT

Sharad Pawar Political Retirement Devendra Fadnavis Reaction
Sharad Pawar Political Retirement Devendra Fadnavis Reaction
social share
google news

Sharad Pawar Political Retirement Devendra Fadnavis Reaction : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केली. लोक माझ्या सांगाती या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी ही मोठी घोषणा केली. या घोषणेनंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर देखील शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम होते. शरद पवार यांच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.(sharad pawar political retirement dcm devendra fadnavis reaction)

ADVERTISEMENT

शरद पवार यांच्या राजीनाम्यावर देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की,पवार साहेबांचा हा वैयक्तिक आणि राष्ट्रवादीचा आंतरीक अशा प्रकारचा निर्णय किंवा प्रश्न आहे. यावर अधिक बोलणे हे योग्य होणार नाही,अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. शेवटी पवार साहेब एक ज्येष्ठ नेते आहेत.त्याच्या पक्षात बरंच मंथन चाललंय, त्यामुळे नेमकी परिस्थिती काय आहे, ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर त्यावर कमेंट करणे योग्य असेल. आम्ही त्यांच्या निर्णयावर नजर ठेवून आहोत, त्याच्यानंतरच यावर भाष्य करू असे फडणवीस म्हणाले आहेत.

हे ही वाचा : राजीनाम्याबाबत शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय, अजितदादांनी सांगितला नेमका निरोप!

मला वाटतं आम्ही थोडी वाट बघितली पाहिजे. हे काय चाललंय? काय होणार आहे? काय होतेय? या सगळ्या गोष्टी जेव्हा स्पष्ट होतील.त्यानंतर विषयावर आम्ही बोलू असे देखील फडणवीस म्हणाले. शरद पवारांच्या पुस्तकारून देखील फडणवीस यांना सवाल करण्यात आला होता. पवार साहेबांचे पुस्तक मी काय वाचले नाही, त्यामुळे त्यावर मी काही बोलणार नाही. पण मलाही एक पुस्तक लिहायचे आहे, ते योग्य वेळी मी लिहणार आहे. नेमकं त्यांनी काय म्हटलंय, मला काय म्हणायचंय, नेमकं सत्य काय आहे असे लिहणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

हे वाचलं का?

शरद पवार निवृत्तीवर काय म्हणाले?

“कोठेतरी थांबणे आवश्यक आहे, मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आता पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी पुढील अध्यक्ष कोण याबाबतचा निर्णय घ्यावा. तसंच सध्याची राज्यसभेची टर्म संपल्यानंतर पुन्हा निवडणुकीला उभं राहणार नाही. आता नवी जबाबदारी नको, असं म्हणतं शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या आणि संसदीय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली होती. मुंबईत ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्र पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना त्यांनी याबाबतची घोषणा केली.

हे ही वाचा : शरद पवारांच्या निर्णयानंतर संजय राऊतांनी सांगितला बाळासाहेबांचा ‘तो’ किस्सा

सिल्व्हर ओकवरील बैठकीनंतर अजित पवार काय म्हणाले?

सिल्व्हर ओकवरील बैठकीनंतर देखील शरद पवार त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. या बैठकीनंतर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना शरद पवारांचा बाहेर येऊन निरोप दिला.‘मग त्यांनी मला त्यांनी, रोहितला आणि छगन भुजबळ साहेबांना सांगितलं. सुप्रियाशी काही गोष्टी ते फोनवरुन बोलले. आणि त्यांनी सांगितलं की, तुम्ही आता तिथे जाऊन माझा निरोप द्या. ते म्हणाले की, माझा निर्णय मी आता दिलेला आहे. परंतु तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर मला विचार करायला 2 ते 3 दिवस लागतील. मला दोन ते तीन दिवस द्या.’‘आपण शेवटी साहेबांना दैवत मानतो. आपलं दैवतच म्हणतंय की, दोन-तीन दिवस द्या. मात्र, ते म्हणाले की, मी विचार केव्हा करेन तर इथले सगळे कार्यकर्ते आपआपल्या घरी निघून गेले तरच. ते म्हणाले तुम्ही आताही मला बसलेले दिसलात तर मी माझा निर्णय बदलणार नाही.’

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT