टीका करण्यापेक्षा काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावं; पवारांना बाळासाहेब थोरातांचं आवाहन
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना जमीनदारी मानसिकतेतून बाहेर येण्याची गरज असल्याचं मत मांडलं होतं. पवारांच्या विधानावर काँग्रेसचे नेते व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भूमिका मांडली आहे. ‘राज्यघटनेच्या मूलभूत विचारांवर चालणाऱ्या लोकांनी काँग्रेसवर टीका करण्यापेक्षा काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावं, असं थोरात यांनी म्हटले आहे. मुंबई बाळासाहेब थोरात यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना […]
ADVERTISEMENT
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना जमीनदारी मानसिकतेतून बाहेर येण्याची गरज असल्याचं मत मांडलं होतं. पवारांच्या विधानावर काँग्रेसचे नेते व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भूमिका मांडली आहे. ‘राज्यघटनेच्या मूलभूत विचारांवर चालणाऱ्या लोकांनी काँग्रेसवर टीका करण्यापेक्षा काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावं, असं थोरात यांनी म्हटले आहे.
ADVERTISEMENT
मुंबई बाळासाहेब थोरात यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना हे आवाहन केलं. ‘शरद पवार यांनी व्यक्त केलेल्या विचारामुळे काँग्रेस पक्षाचे नुकसान होईल, असं मला वाटत नाही. मात्र भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाशी निगडीत विचारांचे जे लोक आहेत, त्यांनी अशी टीका करण्यापेक्षा बरोबर यावे. काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावं आणि लोकशाही आणि राज्यघटना टिकवण्यासाठी एकत्र लढाई करावी’, असं आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केलं.
आजची काँग्रेस म्हणजे नादुरुस्त हवेलीच्या जमीनदारासारखी- शरद पवारांचं परखड भाष्य
हे वाचलं का?
‘काँग्रेस पक्ष ही एक विचारधारा आहे. सध्याचं वातावरण पाहता काँग्रेस विचारांसाठी कठीण दिवस आले आहेत. याचं कारण म्हणजे देशात धार्मिक भेदाभेद करणारे वाढले आहेत. भारतीय राज्यघटनेची मूलभूत तत्वे मानणारे आपण एका विचाराचे आहोत. आपण सर्व एकत्र आलो, तर काँग्रेसला पुन्हा चांगले दिवस येतील’, अशी भूमिका बाळासाहेब थोरात यांनी मांडली.
कांग्रेसबद्दल बोलताना शरद पवार काय म्हणाले होते?
ADVERTISEMENT
शरद पवार यांनी ‘मुंबई तक’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत शरद पवार यांनी विरोधकांच्या आणि काँग्रेसच्या सद्यस्थितीबद्दलही भाष्य केलं होतं.
ADVERTISEMENT
Congress ने अनेकांना जमीन राखायला दिली, काहींनी डाका घातला नाना पटोलेंचं पवारांना उत्तर
‘मागे मी एक गोष्ट सांगितली होती. उत्तर प्रदेशमध्ये जमीनदार आहेत. त्यांच्याकडे मोठी शेती आहे. गावामध्ये त्यांच्याकडे हवेली आहे. लँड सिलिंगचा कायदा आला आणि त्यांच्याकडच्या जमिनी गेल्या. पण हवेली आहे, तशीच आहे. पण त्या हवेलीची दुरुस्ती करण्याची ताकद त्या जमीनदारांमध्ये उरली नाही. हजार एकर जमिनीची आता १५-२० एकरवर आली आहे. सकाळी जमीनदार उठतो आणि हवेलीच्या बाहेर जाऊन बघतो. त्याला आजूबाजूला हिरवं पिक दिसतं. तेव्हा तो हे सर्व हिरवं पिक माझं होतं, असं सांगतो. माझं होतं. आता नाही.’
शरद पवार मोठे नेते, पण…; काँग्रेस नेते तारिक अन्वर यांनी ‘त्या’ विधानावर मांडली भूमिका
पुढे बोलताना पवार म्हणाले, ‘तसं काही मी म्हणत नाही. एकेकाळी काँग्रेस काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत होती. पण ती होती; आहे नाही. होती हे मान्य केलं पाहिजे. मग (विरोधी पक्ष) जवळ येण्याची प्रक्रिया सुरू होईल’, असा सल्ला शरद पवारांनी काँग्रेसला दिला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT