Sunanda Pushkar death case : शशी थरूर निर्दोष! न्यायालयाचे मानले आभार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

काँग्रेसचे नेते आणि खासदार शशी थरूर यांना सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात शशी थरूर यांच्यावर आरोपा करण्यात आलेले होते. या सर्व आरोपातून दिल्लीतील न्यायालयाने थरूर यांची मुक्तता केली आहे. या निकालानंतर थरूर यांनी न्यायालयाचे आभार मानले. १७ जानेवारी २०१४ मध्ये दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह आढळून आला होता.

ADVERTISEMENT

२०१४ मध्ये घडलेल्या सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी दिल्लीतील राऊज एव्हेन्यू न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला. सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू प्रकरणी खासदार शशी थरूर यांच्यावर आरोप करण्यात आले होते. न्यायालयाने शशी थरूर यांची या आरोपांतून निदोर्ष मुक्तता केली.

पाकिस्तानी पत्रकार आणि १७ जानेवारी… दिल्लीत काय घडलं होतं?

हे वाचलं का?

१७ जानेवारी २०१४ रोजी दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी शशी थरूर यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि कलम ४९८ अ (पती वा त्याच्या कुटुंबियांकडून छळ) अतंर्गत गुन्हा दाखल केला होता.

सुनंदा पुष्कर यांनी मृत्यूच्या काही दिवस अगोदर गंभीर आरोप केला होता. त्यांच पती म्हणजे शशी थरूर यांचे एका पाकिस्तानी पत्रकाराशी संबंध असल्याचा दावा त्यांनी केला होता. १५ जानेवारी २०१४ रोजी शशी थरूर यांच्या ट्विटर अकाऊंटवर पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार हिने पाठवलेले कथित खासगी मेसेज शेअर करण्यात आले होते.

ADVERTISEMENT

मात्र, तरार यांनी खाते हॅक झाल्याचं सांगितलं होतं. मात्र सुनंदा पुष्कर यांनी दावा केला, की तरारचे खाते हॅक झालेले नसून, तिने आपल्या पतीवर पाळत ठेवली असावी, हे उघड करण्यासाठीच आपण ते मेसेज ट्विटरवर पोस्ट केले. त्यांनी मेहरवर आयएसआयची एजंट असल्याचाही आरोप केला होता.

ADVERTISEMENT

या प्रकरणानंतर सुनंदा पुष्कर यांनी ‘आपल्याला निवडणुकीच्या वर्ष असल्यानं या प्रकरणाबद्दल सार्वजनिकपणे भाष्य करायचं नाही’, असं म्हटलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी, शशी थरूर यांच्या फेसबुक पेजवर ‘सुनंदा आणि शशी थरूर यांचे संयुक्त निवेदन प्रसिद्ध केलं होतं.

‘आम्ही आनंदाने विवाहबद्ध आहोत. सुनंदा पुष्कर आजारी पडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्या विश्रांती घेत होत्या. सुनंदा यांच्यावर ल्यूपस एरिथेमॅटोससचा उपचार केला जात होता, हा एक प्राणघातक विकार आहे’, असं या निवेदनात म्हटलेलं होतं.

निकाल सुनावल्यानंतर शशी थरूर झाले भावूक

विशेष न्यायाधीश गीतांजली गोयल यांच्या खंठपीठाने हा निकाल दिला. निकाल सुनावल्यानंतर ‘या प्रकरणाच्या सुनावणीत बरंच काही शिकायला मिळालं’, असं सांगत न्यायाधीश गोयल यांनी दोन्ही बाजूच्या पक्षकारांचे आभार मानले. त्यानंतर शशी थरुरही भावूक झाले. मागील साडेसात वर्षांपासून वेदना सहन करत आहे’, असं म्हणत थरूर यांनीही न्यायालयाचे आभार मानले. ही सुनावणी ऑनलाईन झाली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT