शिल्पा शेट्टीचं कुटुंब अडकलं कोरोनाच्या जाळ्यात
संपूर्ण देशभरात कोरोनाचा कहर वाढतोय. अनेक ठिकाणी कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. बॉलिवूडमधील अनेक कलाकार देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. तर अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचं कुटुंब देखील कोरोनाच्या जाळ्यात अडकलं आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी असणारे व्यक्ती तसंच कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत. यासंदर्भात शिल्पाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत माहिती दिली आहे. इन्स्टाग्रामवर लिहिलेल्या पोस्टमध्ये शिल्पा […]
ADVERTISEMENT
संपूर्ण देशभरात कोरोनाचा कहर वाढतोय. अनेक ठिकाणी कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. बॉलिवूडमधील अनेक कलाकार देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. तर अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचं कुटुंब देखील कोरोनाच्या जाळ्यात अडकलं आहे.
ADVERTISEMENT
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी असणारे व्यक्ती तसंच कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत. यासंदर्भात शिल्पाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत माहिती दिली आहे.
इन्स्टाग्रामवर लिहिलेल्या पोस्टमध्ये शिल्पा म्हणते, “गेले 10 दिवस आमच्या कुटुंबासाठी खूप कठीण होते. माझी सासू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजलं. त्यानंतर समीशा, विवान, माझी आई आणि आता राज यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. सध्या आम्ही सर्व मार्गदर्शक सूचनांचं पालन करत आपापल्या रूममध्ये आयसोलेट आहोत. त्याचप्रमाणे डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करत आहेत. इतकंच नाही तर आमच्या घरातील दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं लक्षात आलंय. त्यांच्यावर देखील उपचार सुरु आहेत.”
हे वाचलं का?
दरम्यान या सर्वांमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. शिल्पा तिच्या पोस्टमध्ये पुढे म्हणते, “देवाच्या कृपेने सर्वजण बरे होण्याच्या मार्गावर आहेत. माझी टेस्ट निगेटिव्ह आली आहे. आम्ही बीएमसीच्या सर्व अधिकाऱ्यांच्या मदतीबद्दल आभारी आहोत, हे सर्व त्यांच्या मदतीनेच शक्य झालंय.”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT