छत्रपती शिवरायांच्या विधानांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न? पुरंदरेंच्या ‘शिवसृष्टी’ला भरघोस निधी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वक्तव्यावरील वाद ताजा असतानाच भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, भाजप आमदार प्रसाद लाड, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्यांवरुनही मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावरुन महाविकास आघाडीसह विविध संघटनांनी निषेधही व्यक्त केला. मात्र याच वादावर आता पडदा टाकण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकारकडून केला जात असल्याचं बोललं जात आहे.

ADVERTISEMENT

मंगळवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुण्यात साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’ प्रकल्पाला भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे. दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकरण्यात येत असलेल्या या ऐतिहासिक प्रकल्पाला शिंदे सरकारने ५० कोटींचा निधी मंजूर केला आहे.

सध्या शिवसृष्टीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. यापूर्वी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामाचं उद्घाटन २० नोव्हेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पार पडणार होते. मात्र काही कारणास्तव हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर हा कार्यक्रम डिसेंबरमध्ये होणार असल्याचं कळविण्यात आलं होतं. मात्र आता याबाबत अद्याप तारीख निश्चित झालेली नाही.

हे वाचलं का?

छत्रपती शिवाजी महारांच्या विचारांचा प्रचार सर्वत्र झाला पाहिजे, या उद्देशाने १९९८-९९ साली ‘शिवसृष्टी’ प्रकल्पाला सुरुवात झाली होती. पुण्यातील नऱ्हे आंबेगाव येथे हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प आशियातील सर्वात भव्य ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्प म्हणूनही ओळखला जातो. शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम यांच्या दाव्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाची जाणीव करून देणे हा मुख्य उद्देश आहे.

पहिल्या टप्प्यातील कामात काय काय?

  • प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात महत्त्वाचा भाग असलेल्या सरकारवाडाचे काम पूर्ण झाले आहे.

ADVERTISEMENT

  • ‘सरकारवाडा’ या भागात कामकाजाचे ठिकाण, संशोधन ग्रंथालय, प्रदर्शन आणि बहुपयोगी सभागृह उभारण्यात आले आहे.

  • ADVERTISEMENT

  • शिवाय गड–किल्ल्यांची सफर, राज्याभिषेकाचा देखावा, छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा येथून झालेली सुटका हे प्रसंग थ्री डी तंत्रज्ञान वापरुन साकारण्यात आले आहेत.

  • ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT