शिंदेंच्या सैनिकांना ठाकरेंच्या शिवसैनिकांनी गाडीतून बाहेर काढून केली मारहाण, नक्की काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेनेत फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंचे शिवसैनिकांत हमरीतुमरी झाल्याच्या घटना घडताहेत. दसरा मेळावा पार पडल्यानंतर हा संघर्ष तीव्र होण्याच्या शक्यताही वर्तवल्या जात असताना आज (५ ऑक्टोबर) नाशिक-आग्रा महामार्गावर उद्धव ठाकरेंच्या समर्थक महिला शिवसैनिकांनी शिंदे समर्थक कार्यकर्तांना मारहाण केली. इगतपुरी-कसारा परिसरात ही घटना घडलीये.

ADVERTISEMENT

शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना फुटली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देणाऱ्या शिंदे गटाने दसरा मेळावाही आयोजित केलाय. दसरा मेळाव्याआधीपासूनच ठाकरे आणि शिंदे समर्थक कार्यकर्ते भिडताना दिसत आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने टीझरमधूनही एकमेकांवर बाण डागले जात असून, कार्यकर्तेही भिडताना दिसताहेत.

शिवसेनेचा मेळावा शिवाजी पार्कवर होत असून, शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असून, राज्याच्या विविध भागांतून कार्यकर्ते मेळाव्यानिमित्ताने मुंबईत दाखल होत आहे. दरम्यान, महिला शिवसैनिकांनी शिंदे समर्थक कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा प्रकार घडलाय.

हे वाचलं का?

Dasara Melava 2022 Live : एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात दिसणार प्रति बाळासाहेब ठाकरे!

महिला शिवसैनिकांनी शिंदेंच्या कार्यकर्त्यांवर का भडकल्या?

मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे आणि शिंदे गटाच्या मेळाव्या कार्यकर्ते मुंबईत येत आहेत. ठाकरे समर्थक महिला शिवसैनिक बसमधून मुंबईकडे येत होत्या. यावेळी शिंदे गटाचे कार्यकर्ते बोलेरो गाडीतून जात होते. बसला ओव्हरटेक करताना ठाकरे समर्थक महिला शिवसैनिकांनी केलेल्या दाव्याप्रमाणे शिंदे समर्थक कार्यकर्त्यांनी त्यांना हातवारे करून डिवचलं. तसेच अश्लील इशारे केले.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंची शिवसेना खिळखिळी करण्याचा शिंदेंचा प्लान, कृपाल तुमानेंचा मोठा गौप्यस्फोट

ADVERTISEMENT

त्यानंतर महिला शिवसैनिकांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची गाडी थांबवली. त्यानंतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना जाब विचारत गाडीतून बाहेर काढलं. हातवारे आणि शिवीगाळ का केली म्हणत शिंदे गटातल्या कार्यकर्त्यांना चोप दिला. शिंदे समर्थकांना समज दिल्यानंतर महिला शिवसैनिक बसमधून मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या.

नाशिक-आग्रा महामार्गावर इगतपुरी-कसारा परिसरात झालेल्या घटनेप्रकरणी इगतपुरी आणि कसारा पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त झालेली नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT