अमरावतीत शिवसेना उपजिल्हा प्रमुख योगेश घारड यांच्यावर गोळीबार, नागपुरात उपचार सुरू
अमरावती जिल्ह्यातील वरुडीचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख योगेश घरड यांच्यावर गोळीबार झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरुड शहरातील मुलताई चौकामध्ये योगेश घारड उभे असतांना बाईकवर दोघे झाले होते त्यातल्या एकाने त्यांच्यावर दोन राऊंड चालवले त्यामध्ये एक गोळी योगेश यांनी कशीबशी वाचवली. मात्र दुसरी गोळी त्यांना लागली. कमरेच्या वरच्या भागात ही गोळी लागल्याने ते […]
ADVERTISEMENT
अमरावती जिल्ह्यातील वरुडीचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख योगेश घरड यांच्यावर गोळीबार झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरुड शहरातील मुलताई चौकामध्ये योगेश घारड उभे असतांना बाईकवर दोघे झाले होते त्यातल्या एकाने त्यांच्यावर दोन राऊंड चालवले त्यामध्ये एक गोळी योगेश यांनी कशीबशी वाचवली. मात्र दुसरी गोळी त्यांना लागली. कमरेच्या वरच्या भागात ही गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले.
ADVERTISEMENT
योगेश घारड यांच्यावर गोळीबार का झाला याचं कारण कदाचित जमिनीचा वाद आहे असं पोलिसांनी सांगितलं आहे. कारण योगेश घारड आणि आरोपी राहुल आरोपी राहुल तडस यांच्यात प्लॉटवरून वाद सुरू होता. या वादातूनच ही घटना घडली आहे असं पोलिसांनी सांगितलं. राहुल तडसने योगेश घारड यांच्यावर दोन राऊंड चालवले अशी माहिती अमरावतीचे ग्रामीण एडिशनल एसपी शशिकांत सावंत यांनी दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले आणि जखमी असलेल्या योगेश घारड यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी लगेच गंभीर अवस्थेत असलेले योगेश घारड यांना पुढील उपचारासाठी नागपूरला रेफर केले सध्या योगेश यांची तब्बेत गंभीर असून नागपुरात इलाज करण्यात येत आहे. या घटनेनंतर तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले होते आणि आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली पोलिसांनी आरोपीला अटक केली असून दुसरा आरोपी अजून फरार आहे. पोलीस त्याचाही शोध सुरू आहे या हल्ल्याचा निषेध करत शनिवारी शिवसेनेच्या वतीने बाजारपेठ बंदचं आवाहन केलं होतं.
हे वाचलं का?
योगेश घारड यांचं आवाहन
२३ एप्रिल रोजी रात्री १० वाजता दरम्यान वरुडमधील मूलताई परिसरात शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख योगेश घारड यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात गोळी लागल्याने घारड जखमी झाले होते..आपसी वादातून हा गोळीबार झाल्याचं बोललं जातं आहे. त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर नागपूर खासगी रुग्णालयात हलविण्यात आलं होतं. त्यानंतर योगेश घारड यांनी स्वतः रुग्णालयातून शिवसैनिकांना शांतता राखण्याच आव्हाहन केलं आहे. याशिवाय आपली प्रकृती स्थिर असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT