Shiv Sena Dussehra Melava: ‘कोणाच्याही बायको-मुलांवर खोटे आरोप करणं म्हणजे अक्करमाशेपणा’, CM ठाकरेंची तुफान टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: ‘कोणाच्याही कुटुंबावर वैयक्तिक… पत्नीवर आणि मुलांवर खोटे आरोप करणं हे हिंदुत्व नाही. याला नामर्द किंबहुना अक्करमाशापणा म्हणतात.’ अशा शब्दात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर प्रचंड तोंडसुख घेतलं. याचवेळी त्यांनी भाजपला आपलं सरकार पाडून दाखविण्याचं आव्हान देखील दिलं.

ADVERTISEMENT

अनेक दिवसांनी आपल्याला असं जाहीर बोलण्याची संधी मिळाली आहे. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आपल्या विरोधकांवर ‘ठाकरी शैली’त टीका केली. मागील काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे केंद्रीय संस्थांच्या अनेक चौकशा सुरु आहेत. याच मुद्द्यावरुन देखील उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पाहा उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले.

…याला अक्करमाशापणा म्हणतात!

हे वाचलं का?

‘कोणाच्याही कुटुंबावर वैयक्तिक.. पत्नीवर, मुलांवर खोटे आरोप करणं हे हिंदुत्व नाही. याला नामर्द किंबहुना अक्करमाशापणा म्हणतात. मर्दासारखा समोर गेले पाहिजेत. कोणाच्या तरी आडून-लपून हल्ले करायचे आणि ‘तो मी नव्हेच’… षंढ आहेस तू..’ अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला.

‘…नाहीतर फाडायला वेळ लागणार नाही’

ADVERTISEMENT

‘माफ करा थोडंसं… एवढ्या वर्षानंतर काही तरी वडिलोपार्जित जी संपत्ती शब्दांची आहे ती तरी वापरु द्या. आहे संपत्ती सगळी आहे माझ्याकडे. अगदी थोडेफार आजोबांचेही शब्द पाठ आहेत मला. वडिलांचे तर आहेच आहेत.. पण जरा माँ चा संस्कार आहे म्हणून ते वाचतायेत.. नाही तर फाडायला काही वेळ नाही लागत.’ असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी विरोधकांना दिला.

ADVERTISEMENT

‘यांना निवडणुकांसाठी उपरे लागतात उपरे..’

‘मगाशी मी तुम्हाला सांगितलं.. छापा की काटा… काटा कसा असतो हे बोचल्यानंतर कळेल.. नशीबवान समजा अजून बोचत नाहीए. पण सत्तापिपासूपणा किती. प्रत्येक सगळ्या गोष्टी मला पाहिजेत.. नुकत्याच दोन पोटनिवडणुका झाल्या. एक पंढरपूरची झाली आणि एक दुसरी लागली आहे. पण दोन्ही पोटनिवडणुकांमध्ये यांच्याकडे स्वत:चे उमेदवार नाही. उपरे लागतात उपरे.. आणि जगातला मोठा पक्ष. काय मोठा पक्ष आहे.. उमेदवारच नाही उपरे घ्यावे लागतात.’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर प्रचंड टीका केली आहे.

‘मी मुख्यमंत्री आहे असं मला कधीच वाटत नाही, तुम्ही वाटून घेऊ नका’ उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना भीमटोला

दरम्यान, आता उद्धव ठाकरे यांच्या या भाषणानंतर भाजप नेते नेमकी काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, पुढील काही दिवस मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर वाद-प्रतिवाद होण्याची दाट शक्यता आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT