Sanjay Raut यांचं नवं ‘मार्मिक’ ट्विट, कोणाला दिला सूचक इशारा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना झालेल्या अटकेमुळे महाराष्ट्रातील राजकारण हे अक्षरश: ढवळून निघालं आहे. राज्यात शिवसेनेची (Shiv Sena) सत्ता आल्यापासून पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि ते देखील अत्यंत आक्रमकपणे शिवसैनिक रस्त्यावर उतरले. त्यामुळे आता पुढील काही दिवस तरी हा संघर्ष अशाच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळू शकतो. असं असतानाच आता शिवसेनेचे खासदार आणि ज्येष्ठ नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सकाळी-सकाळीच एक सूचक ट्वीट (Tweet) केलं आहे.

ADVERTISEMENT

राज्यात 2019 विधानसभा निवडणुकीनंतर जो सत्ताबदल झाला त्यात संजय राऊत यांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची होती. त्यावेळी संजय राऊत हे साधरण दररोज आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन काही सूचक अशा स्वरुपाचे ट्विट किंवा कवितेच्या ओळी शेअर करायचे. ज्याचे अनेक वेगवेगळे राजकीय अर्थ त्यावेळी लावले जायचे. असं असताना आता मागील दोन दिवसांपासून राऊतांनी पुन्हा तशाच स्वरुपाचं ट्विट करणं सुरु केलं आहे.

संजय राऊत यांनी नेमकं काय ट्विट केलं आहे?

हे वाचलं का?

संजय राऊत यांनी आज (26 ऑगस्ट) पुन्हा एकदा सूचक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी ‘शक्ती मुद्रा’ असलेला एक फोटो शेअर केला आहे.

राऊत यांच्या या फोटोचे आता राजकीय विश्लेषक वेगवेगळे अर्थ लावू लागले आहे. राणेंच्या अटकेनंतर महाराष्ट्रात जो काही आगडोंब उसळला आहे. तो आता इतक्यात थांबण्याची शक्यता नाही. त्यामुळे आगामी काळात शिवसेना विरुद्ध राणे समर्थक असा टोकाचा संघर्ष पाहायला मिळू शकतो. त्यामुळे राऊतांचं आजचं ट्विट हे त्याचीच नांदी तर नाही ना? असा सवाल विचारला जात आहे.

ADVERTISEMENT

वाघाने कोंबडी पकडल्याचं ट्विट करत राऊतांकडून राणेंना डिवचण्याचा प्रयत्न

ADVERTISEMENT

दरम्यान, शिवसेना आणि राणे यांच्यातील संघर्षादरम्यान, संजय राऊत यांनी खास आपल्या मार्मिक शैलीत काल (25 ऑगस्ट) एक ट्विट केलं होतं. राऊतांनी वाघाने कोंबडी आपल्या तोंडात पकडल्याचा फक्त एक फोटो ट्विट केला होता. पण या ट्विटचा रोख पूर्णपणे राणेंकडेच होता.

शिवसैनिक हे राणेंचा कोंबडी चोर असा उल्लेख करतात. अशावेळी संजय राऊत यांनी कोंबडी तोंडात पकडलेला वाघाचा फोटो शेअर करुन शिवसेनेने राणेंना आपल्या पकडीत पकडलं असल्याचं सुचवू इच्छित असल्याचं दिसून येत आहे. याच ट्विटच्या माध्यमातून राऊतांनी राणेंना डिवचण्याचाही प्रयत्न केला.

Narayan Rane: ठाकरे सरकार सिंधुदुर्गातील ‘त्या’ फाइल पुन्हा ओपन करणार?

दरम्यान, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, गेले दोन दिवस संजय राऊत हे भुवनेश्वरच्या दौऱ्यावर होते. मात्र, आता राज्यातील राजकारण झपाट्याने बदलत चाललं असल्याने संजय राऊत हे आपला दौरा अर्धवट सोडून पुन्हा महाराष्ट्रात येणार असल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. अशावेळी राज्यात नेमकं काय घडणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT