Sanjay Raut: ‘याला गटारात तोंड बुडवून थुंकणं म्हणतात’, राऊतांचं राणेंना प्रत्युत्तर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: ‘नारायण राणे जे बोलले त्याला टीका म्हणत नाही. त्याला गटारात तोंड बुडवून थुंकणं असं म्हणतात.’ अशा शब्दात शिवसेना खासदार संजय (Sanjay Raut) यांनी राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याबाबत संताप व्यक्त केला आहे.

ADVERTISEMENT

पाहा संजय राऊत नेमकं काय-काय म्हणाले:

‘याला गटारात तोंड बुडवून थुंकणं म्हणतात’

हे वाचलं का?

‘टीका बाळासाहेब ठाकरे यांच्यावर देखील व्हायची. बाळासाहेब नेहमी म्हणायचे की, दोन घ्यायच्या असतात. दोन द्यायचे असतात. ज्या भाषेत टीका व्हायची ती सर्वांनी स्वीकारलेली होती. पण आता जी काही टीका होत आहे त्याला टीका म्हणत नाही. त्याला गटारात तोंड बुडवून थुंकणं म्हणतात. पण त्यात तुमचंच तोंड गटारात बुडून खराब होतं, लक्षात होतं. कोणीही असतील ते.’ अशा शब्दात संजय राऊत यांनी नारायण राणेंच्या टीकेच्या समाचार घेतला.

‘योगी आदित्यनाथ यांच्याबाबत सहा वर्षांनी ऐकू आलं?’

ADVERTISEMENT

भारतीय जनता पक्ष कोणावरही गुन्हा दाखल करु शकतो. इतका महान पक्ष आहे तो. तो परग्रहातील लोकांवर देखील गुन्हे दाखल करेल. त्यांच्या हातात यंत्रणा आहे ते काहीही करु शकतात. योगी आदित्यनाथ यांच्याबाबत बोललेलं यांना सहा वर्षांनी ऐकू आलं का? उस थप्पड की गूँज.. आमच्या मुंबईत चांगले ENT डॉक्टर आहेत. पाठवून देतो ज्यांना गूँज आता ऐकू आली त्यांना.’ असं म्हणत राऊतांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली आहे.

ADVERTISEMENT

‘आमच्यावर बोलण्यासाठीच तुम्हाला मंत्रिपद दिलंय’

‘सरकार पाडत राहा, पाडण्याचे प्रयत्न करत राहा. तुम्हाला कोणी अडवलं आहे का? लोकशाही आहे आम्ही मानतो लोकशाही. शिवसेना इतका मोठा पक्ष आहे, सूर्यासारखा इतका तेजस्वी आहे. थुंकण्याचा प्रयत्न करणाच ते. शिवसेना हा बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेला तेजस्वी राजकीय पक्ष आहे. हा असाच तळपत राहणार. ज्यांना मोठं आहे ते सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करतायेत. बाकी तुमच्याकडे भांडवल आहे काय? म्हणूनच तुम्हाला मंत्रिपद दिलं जातं. बोलू द्या… त्यांच्या बोलण्याने आम्हाला भोकं पडत नाही. आमचा फुगा फुगतोच.’ असंही राऊत यावेळी म्हणाले.

‘इथे येऊन बकाल बडबड करण्यासाठी मंत्रिपद मिळालेलं नाही’

‘महाराष्ट्राचा प. बंगाल होऊ देणार नाही म्हणजे काय?, प. बंगालला तुमचा पराभव झाला हे लक्षात ठेवा. पळून जावं लागलं तिथून तुम्हाला. एखाद्या राज्याचा असा अपमान कराल तर हा देश तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही केंद्रीय मंत्री आहात.. तुम्ही देश समजून घ्या. मग तुम्ही राजकारणावर बोला. तुम्ही केंद्रीय मंत्री आहात ते तुमच्या खात्याचं काम करण्यासाठी. तुमचं जे काही स्क्षूम खातं आहे त्या खात्याचं काम करण्यासाठी तुम्हाल मंत्री म्हणून नेमलं आहे. इथे येऊन बकाल बडबड करण्यासाठी मंत्रिपद नाहीए.’ अशा शब्दात संजय राऊत यांनी नारायण राणेंवर टीका केली आहे.

‘तर आम्ही तुमचंही स्वागत करु’

‘तुम्ही तुमचं खातं मजबूत करा, देशाला दिशा द्या आम्ही तुमचं स्वागत करु. इथे येऊन बकवास करु नका. हे मी आता सांगतोय आणि शहाणपणा कराल… आमच्या अंगावर याल तर एक लक्षात घ्या शिवसेनाच आहे. बडबडण्याने काही होत नाही. तुम्ही किंवा तुमची पोरं.’ असं म्हणत राऊतांनी पुन्हा एकदा राणेंना चुचकारलं आहे.

Sanjay Raut यांचं नवं ‘मार्मिक’ ट्विट, कोणाला दिला सूचक इशारा?

‘आम्ही टीकेला घाबरत नाही’

‘आम्ही टीकेला घाबरत नाही. टीका करा.. या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणापासून उद्धव ठाकरेंपर्यंत मत त्यात बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे देखील आले. यांनी कधीही टीकेला विरोध केला नाही. विधायक टीकेचं महाराष्ट्राने नेहमी स्वागत केलं आहे. कारण आम्ही महाराष्ट्राची संस्कार, संस्कृती जाणतो.’ असं राऊत म्हणाले.

दरम्यान, संजय राऊत यांच्या या टीकेला नारायण राणे नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT