शिवसेना भवनासमोर राडा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांची पाठ थोपटली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईत बुधवारी शिवसेना भवनासमोर भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला. सामना या अग्रलेखात राम मंदीर जमिन खरेदीच्या घोटाळ्याची चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेनेने केली होती. यानंतर भाजपने शिवसेनेविरोधात मोर्चा उघडून शिवसेना भवनासमोर आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची आणि वाद झाला.

ADVERTISEMENT

या प्रकरणात पोलिसांनी संबंधित शिवसेना पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. शिवसैनिकांनी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याला लाथेने मारहाण केल्याचा आरोपही विरोधी पक्षांकडून गेला जातोय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दादर, माहीम, वडाळा भागातील शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांचं कौतुक केलं.

शिवसेनेने आपल्या ट्विटर हँडलवरुन या भेटीचे फोटो पोस्ट करत शिवसैनिक आणि शिवसेना पक्ष प्रमुख अशी कॅप्शन दिली आहे. भाजप कार्यकर्त्यांसोबत झालेल्या वादानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतलेली शिवसैनिकांची भेट ही वेगळेच संकेत देत आहे. या भेटीने उद्धव ठाकरेंनी घडलेल्या प्रकाराबद्दल शिवसैनिकांचं कौतुक करत त्यांचं समर्थन केल्याचं दिसून येतंय.

हे वाचलं का?

सेना भवनासमोर झालेल्या या राड्यानंतर सोशल मीडियावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जुने व्हिडीओ व्हायरल होत होते. ज्यात बाळासाहेबांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे उद्धव ठाकरेंनीही शिवसैनिकांच्या पाठीशी उभं राहून त्यांच्या पाठीव कौतुकाची थाप मारली आहे. आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक लक्षात घेता शिवसेना आणि भाजपमध्ये या मुद्द्यावरुन वाद वाढण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT