Shiv Sena UBT: न्यायमूर्तींना प्रलोभनं? सुनावणीपूर्वी मोदींवर गंभीर आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Shiv Sena hits out pm Narendra over Appointment of Abdul Nazeer as Governor : सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) सेवानिवृत्त न्यायमूर्ती (retired justice) अब्दुल नजीर (Abdul Nazeer) यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपाल (governor of andhra pradesh) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याच नियुक्तीवरून विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये संघर्षाची ठिणगी उडाली असून, सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगातील शिवसेनेच्या सुनावणीपूर्वी शिवसेनेच्या ठाकरे गटाने मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. (shiv sena serious allegations on pm narendra modi)

ADVERTISEMENT

शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सामना अग्रलेखातून राज्यपालांच्या नियुक्त्यांवर भाष्य करताना सेवानिवृत्त न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांच्या नियुक्तीवर बोट ठेवलं आहे. महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या खटल्यांमधील सेवानिवृत्त न्यायमूर्तींनाच अशा पद्धतीने उपकृत केलं गेलं असल्याचं शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) म्हटलं आहे.

राज्यपालांच्या नियुक्त्या… शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) काय म्हटलंय?

सामनात म्हटलं आहे की, “आपण एकटेच सर्व विरोधकांना कसे भारी पडलो आहोत हे पंतप्रधान मोदी यांनी भर संसदेत छातीवर मूठ आपटून सांगितले. वेगळ्या भाषेत त्यास ‘छाती पिटणे’ असेही म्हटले जाते. असे छाती पिटून बोलणे पंतप्रधानपदास शोभत नाही. हाती पोलीस, न्यायालय, केंद्रीय तपास यंत्रणांची फौज ठेवून ‘मी एकटाच लढत आहे व सगळ्यांना भारी पडत आहे’, असे सांगणे मजेशीर आहे व ही मजा फक्त मोदीच करू शकतात. अशी मजा आपल्या देशात गेली सात-आठ वर्षे सुरूच आहे.”

हे वाचलं का?

Ramesh Bais: नगरसेवक ते महाराष्ट्राचे राज्यपाल, कोण आहेत रमेश बैस?

“कोश्यारी यांची जागा झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली आणि तेदेखील मनाने व रक्ताने भाजपचे स्वयंसेवकच आहेत. त्यावर नंतर बोलू, पण नव्या राज्यपाल नियुक्त्यांत एक तेजस्वी व चमकदार नाव आले. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अब्दुल नझीर हे ते नाव. त्यांना आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे”, असं म्हणत शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सेवानिवृत्त न्यायधीशांच्या नियुक्त्यांच्या मुद्द्याला हात घातला आहे.

शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) म्हटलं आहे की, “आता हे सन्माननीय नझीर कोण, तर अयोध्येतील राममंदिराचा निकाल देणाऱ्या घटनापीठाचे ते सदस्य होते व अलीकडेच ‘नोटाबंदी’ प्रकरणात मोदी सरकारला क्लीन चिट देणाऱ्या खंडपीठावरही न्या. नझीर होते. तेच न्या. नझीर आता सरकारी कृपेने आंध्रच्या राजभवनात पोहोचले आहेत.”

ADVERTISEMENT

न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांचा शिवसेनेनं काढला इतिहास

सेवानिवृत्त न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांच्याबरोबरच शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यापूर्वी मोदी सरकारकडून करण्यात आलेल्या निवृत्त न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांवर बोट ठेवलंय. “याआधी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई हे निवृत्त होताच त्यांना राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्त केले गेले. गोगोई हेसुद्धा राम मंदिराबाबत निकाल देणाऱ्या घटनापीठाचे प्रमुख होते व सरकारला अडचणीत आणणाऱ्या काही प्रकरणांवर त्यांनी सोयीचे निकाल दिले. राफेल व्यवहारात काहीच काळेबेरे नाही, सर्व व्यवहार स्वच्छ आहेत असे मत न्या. रंजन गोगोई यांनीच मांडल्याचे आठवते”, असं शिवसेनेनं (यूबीटी) म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray : हो… मला तुमची साथ हवी आहे, ठाकरेंची उत्तर भारतीयांना साद

“मोदींचे सरकार येताच अशा प्रकारे अनेक न्यायाधीशांना निवृत्तीनंतर लाभाची राजकीय पदे देण्यात आली. विशेषतः मुख्य न्यायाधीश पदावरून पायउतार झालेल्या अनेकांना मोदी सरकारने उपकृत केले ते काय उगीच? खुर्च्यांवर विराजमान असताना अदृश्य पद्धतीने काहीतरी हातमिळविणी झाल्याशिवाय अशा नेमणुका सहसा होत नाहीत,” असं म्हणत शिवसेनेनं न्यायमूर्ती आणि सरकारमध्ये पडद्यामागे हातमिळवणी असल्याचाच अप्रत्यक्ष पण गंभीर आरोप केलाय.

सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोगातील सुनावणी : शिवसेनेनं (यूबीटी) त्या विधानांवरुन भाजपला केलं लक्ष्य

“महाराष्ट्रातील सत्तांतरांचीच सुनावणी निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयात सध्या सुरू आहे. एका घटनाबाह्य सरकारच्या बाबतीत दोन्ही सर्वोच्च संस्थांनी किती वेळ घ्यावा? किती तारखांचे तारे तोडावेत? राज्यात एक घटनाबाह्य सरकार बसले आहे व ते बेफामपणे, बेकायदेशीरपणे निर्णय घेत आहे. पुन्हा राज्याचे ‘भाजप’ गृहमंत्री, केंद्रीय मंत्री जाहीरपणे सर्वोच्च न्यायालय-निवडणूक आयोगाचा हवाला देत सांगतात, ‘चिन्ह मिंध्यांना मिळणार व सर्वोच्च न्यायालय आपल्याच बाजूने निर्णय देणार!’ हा इतका आत्मविश्वास येतो कोठून? हा आत्मविश्वास न्यायमूर्तींच्या निवृत्तीनंतरच्या नियुक्त्यांमुळे तर येत नाही ना? अशी खात्री पटते”, असं म्हणत शिवसेनेनं (यूबीटी) देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांनी केलेल्या विधानावर भाष्य केलं आहे.

BMC Election : भाजपचा फॉर्म्यूला ठरला, टार्गेट निश्चित! कार्यकारिणीत काय घडलं?

कोश्यारींचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

“मोदी सरकारातील एका वरिष्ठ मंत्र्यावर खास मेहेरबानी दाखविणाऱ्या मुख्य न्यायाधीशांना नंतर केरळचे राज्यपालपद बहाल केले गेले होते तर आणखी कुणाला मानवी हक्क आयोगाचे चेअरमन बनवून गाडी-घोड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे पंतप्रधान मोदी छातीवर मूठ मारून जे सांगतात की, ‘मैं अकेला लढ रहा हूं और सबको भारी पड रहा हूं.’ हे काही खरे नाही. विरोधकांच्या अंगावर फेकण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचे साप, विंचू, मगरी वगैरे त्यांनी पाळून ठेवले आहेत. राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून त्यांनी ‘मविआ’ सरकारविरुद्ध अनेक बेकायदेशीर कृत्ये करून घेतली”, असं टीकास्त्र शिवसेनेनं (यूबीटी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर डागलं आहे.

मोदी आणि त्यांची गोल्डन गँग… शिवसेनेचे (यूबीटी) पंतप्रधानांना चिमटे

अग्रलेखाच्या शेवटी शिवसेनेनं म्हटलं आहे की, “महाराष्ट्रात शिवसेनेशी लढतानाही मोदी एकटे नव्हते, तर राज्यपाल कोश्यारी त्यांच्या ‘गोल्डन गँग’चे सदस्य होते. या ‘गोल्डन गँग’च्या सदस्यांना लाभाची पदे व आमिषे देऊन लढाईला उतरणे ही काही मर्दुमकी नाही. राज्यघटनेची व तिच्या रक्षकांची इतकी मानहानी कधीच झाली नव्हती. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांचे स्वागत करताना थोडा कोळसा उगाळावा लागला. कारण चंदन उगाळण्याचे दिवस संपवले गेले आहेत”, अशा शब्दात शिवसेनेनं (यूबीटी) मोदींना चिमटे काढले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT