इस्लाम धर्म हाच देशाचा खरा शत्रू – संभाजी भिडेंच्या वादग्रस्त विधानामुळे वादाचे संकेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमी चर्चेच राहणारे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील शिरुर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मास निमीत्त उपस्थित कार्यकर्त्यांना भिडे गुरुंजींनी संबोधित केलं. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना भिडे गुरुजींनी हिंदु-मुस्लीम समाजात तेढ निर्माण होणारं वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडलं आहे.

ADVERTISEMENT

इस्लाम धर्म हाच खरा देशाचा शत्रू आहे असं वक्तव्य करत भिडे गुरुजींनी देशातील मुस्लीम समुदायाची तुलना औरंगजेबाशी केली आहे.

नेमकं काय म्हणाले संभाजी भिडे गुरुजी?

हे वाचलं का?

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास आपण पाळत आहोत. त्यामध्ये हिंदुस्थानच्या अस्तित्वाला आव्हान दडलेलं आहे. आजही औरंगजेब नसला तरी पाकिस्तान, बांगलादेश आणि भारतातील मुस्लिम समाजाच्या रुपाने तो शत्रू म्हणून हिंदू समाजाच्या पुढे उभा ठाकला आहे. देशासाठी आणि हिंदू धर्मासाठी ऐन तारुण्यात संभाजी महाराजांनी बलिदान पत्कारले पण धर्म सोडला नाही.

छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास पाळत असताना हिंदुस्थानातील प्रत्येक हिंदुने छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देता कमा नये. संभाजी महाराजांना हाल-अपेष्टा सहन करत मरणाला प्रवृत्त करणारा तोच इस्लाम धर्म, मुस्लिम समाज आज हिंदुस्थानचा खरा शत्रू आहे. त्यामुळे आपल्याला सावध राहण्याची गरज आहे. संभाजी महाराजांच्या बलीदानाचा सूड घेण्याची तसेच जसेच्या तसे उत्तर देण्याची ताकद प्रत्येक हिंदू दाखवेल, असा एक दिवस नक्की उगवेल. हीच खऱ्या अर्थाने हिंदुस्थानातील हिंदुची छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली असेल.

ADVERTISEMENT

संभाजी भिडे यांनी नुकतीच वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळावर दर्शन घेतले. त्यानंतर शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा, निर्वी या गावात जाऊन त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. त्यामुळे या वक्तव्याचे आता काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT