Narayan Rane येऊन गेल्यानंतर शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मारकाचं शुद्धीकरण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळख असलेल्या नारायण राणेंनी आजपासून मुंबईत जन आशिर्वाद यात्रेला सुरुवात केली. यात्रेला सुरुवात करण्याआधी नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन बाळासाहेबांना अभिवादन केलं. परंतू राणे आणि शिवसेना वादाचा परिणाम या भेटीवरही झालेला आहे. नारायण राणे निघून गेल्यानंतर शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या स्मारकाचं दुध आणि गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण केलं.

ADVERTISEMENT

शुद्धीकरणानंतर स्थानिक शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेला फुलं वाहून हार घालत धुपही ओवाळला. शिवसैनिकांच्या या कृत्यानंतर राज्यात पुन्हा एकदा नारायण राणे विरुद्ध शिवसेना हा वाद रंगण्याची चिन्ह दिसत आहेत. दरम्यान बाळासाहेबांच्या स्मारकाचं शुद्धीकरण करणाऱ्या स्थानिक शिवसैनिकांनी यावेळी नारायण राणेंवर जोरदार टीका केली.

हे वाचलं का?

आम्ही ठाकरे कुटुंबाबद्दल निष्ठा राखणारे शिवसैनिक आहोत. त्यांना आज शिवसेना दिसली. इतक्या वर्षात शिवसेना सोडून गेल्यानंतर त्यांना बाळासाहेब दिसले नव्हते. देशाच्या टॉप ५ मध्ये असणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ते काहीही बोलत होते. त्यामुळे आम्ही हे सहन करू शकत नाही. म्हणून आम्ही हे शुद्धीकरण केलं आहे अशी प्रतिक्रीया शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिली. नारायण राणेंच्या येण्याने ही वास्तू अपवित्र झाल्याचा टोलाही शिवसैनिकांनी लगावला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे जनआशिर्वाद यात्रेदरम्यान बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला भेट देणार असल्याचं जाहीर झाल्यानंतर शिवसेनेतून त्याला विरोध करण्यात आला होता. खासदार विनायक राऊत यांनी राणेंना स्मृतीस्थळाच्या ठिकाणी पाऊल ठेऊ देणार नाही, अशी घोषणा देखील केली होती. मात्र, त्यानंतर वातावरण निवळलं आणि राणेंनी विनासायास स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतलं.

ADVERTISEMENT

मराठी माणसासाठी शिवसेनेने काय केलं? Narayan Rane यांनी विचारला प्रश्न

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT