Uddhav Thackeray : 40 डोक्यांच्या रावणानं प्रभु रामाचं धनुष्य-बाण गोठवलं : ठाकरेंचा संताप
मुंबई : ज्या धनुष्य-बाणांची शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे मनोभावे पूजा करत होते, जो धनुष्यबाण आजही त्यांच्या देवाऱ्यात आहे. पण 40 डोक्यांच्या रावणानं प्रभु रामाचं हे धनुष्य बाणं गोठवलं. यासाठी थिजलेली मनं आणि गोठलेलं रक्तच पाहिजे. कारण शिवसेना म्हटलं की सळसळतं रक्त आणि तापलेलं डोकं आठवतं, असं म्हणतं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा […]
ADVERTISEMENT
मुंबई : ज्या धनुष्य-बाणांची शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे मनोभावे पूजा करत होते, जो धनुष्यबाण आजही त्यांच्या देवाऱ्यात आहे. पण 40 डोक्यांच्या रावणानं प्रभु रामाचं हे धनुष्य बाणं गोठवलं. यासाठी थिजलेली मनं आणि गोठलेलं रक्तच पाहिजे. कारण शिवसेना म्हटलं की सळसळतं रक्त आणि तापलेलं डोकं आठवतं, असं म्हणतं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि भाजपवर निशाणा साधला. शिवसेनेचे नाव आणि पक्ष चिन्ह गोठवल्यानंतर ते पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले होते.
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरेंचा भाजपवरही निशाणा :
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, उलट्या काळजाची काही माणसं आणि त्यांचे कंपू फिरतात, त्यांचा राग येतो. पण वाईट वाटतं की, ज्या शिवसेनेनं तुम्हाला राजकीय जन्म दिला, जी शिवसेना तुमची राजकीय आई आहे. त्याच आईच्या काळजात कट्यार घुसवली. शिवसेना हे पवित्र नाव गोठवलं. शिवसेनेचं पवित्र चिन्ह गोठवलं. त्यांना आता आनंदानं उकळ्या फुटत असतील.
पण त्याहीपेक्षा त्यांच्या मागे जी महाशक्ती आहे, तिला जास्त आनंद होत असेल. बघा आम्ही करुन दाखवलं. जे आम्हाला जमलं नाही, ते त्यांचीच माणसं फोडून त्यांच्याच माध्यमातून करुन दाखवलं. कशी ही माणसं काय? मिळवलं तुम्ही? ज्या शिवसेनेनं मराठी माणसाला आधार दिला, ज्या शिवसेनेनं मराठी मन पेटवली आणि हिंदु आस्मिता जपली, त्या शिवसेनेचा घात तुम्ही करायला निघाला आहात, ते शिवसेना हे पवित्र नाव तुम्ही गोठवलं, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
हे वाचलं का?
शिवसेना आणि तुमच्या नावाच काय संबध आहे?
मराठी माणसाठी एकजूट तुम्ही फोडायाला निघालात. या देशात हिंदु म्हणायची कुणाची हिंमत नव्हती, ती हिंमत ज्या शिवसेनाप्रमुखांनी दिली ती हिंमत तुम्ही गोठवली. हे हिंदुत्व असेच उभं राहिलं नाही, त्यासाठी शिवसेनाप्रमुखांनी अंगावर धोके स्वीकारलेत, आम्ही सुरक्षेमध्ये राहत होतो, पण नाही म्हटलं तरी अतिरेक्यांचा धोका आणि धमक्या यासोबत हे सगळं पुढे आणलं आहे, असे ठाकरे म्हणाले.
मुळात शिवसेना आणि तुमच्या नावाच काय संबध आहे? जे नाव माझ्या आजोबांनी दिलं, जे नाव माझ्या वडिलांनी रुजवलं, तेच मी पुढे घेऊन जात आहे. पण तुम्ही त्याचा घात करत आहे, असेही ठाकरे म्हणाले. तसेच तुमची बुद्धी गोठलेली नसेल तर आता बाळासाहेबांचं नाव न वापरता समोर या. स्वतःचा पक्ष काढा, भाजपमध्ये जा, असेही आव्हान ठाकरे यांनी यावेळी दिले. तसेच आजही तुम्हाला शिवसेना पाहिजे, बाळासाहेब पाहिजेत, पण बाळासाहेबांचा मुलगा नको, अशी टीकाही त्यांनी केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT