हे उरल्यासुरल्या अकलेचे दिवाळं काढण्याचं लक्षण ! ‘मद्यराष्ट्र’ वादावरुन शिवसेनेचा भाजपला टोला
महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाने कॅबिनेट बैठकीत राज्यातील सुपरस्टोअर्समध्ये वाईन विक्रीला मान्यता दिली. १ हजार चौरस फूटापेक्षा जास्त जागेत असलेल्या सुपरमार्केटमध्ये आता वाईन विक्री करता येणार आहे. परंतू राज्य सरकारच्या या निर्णयावर सोशल मीडिया आणि विरोधीपक्षांकडून चांगलीच टीका होते आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयावर बोलताना महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवण्याची योजना असल्याचं म्हटलं आहे. शिवसेनेने आजच्या सामना […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाने कॅबिनेट बैठकीत राज्यातील सुपरस्टोअर्समध्ये वाईन विक्रीला मान्यता दिली. १ हजार चौरस फूटापेक्षा जास्त जागेत असलेल्या सुपरमार्केटमध्ये आता वाईन विक्री करता येणार आहे. परंतू राज्य सरकारच्या या निर्णयावर सोशल मीडिया आणि विरोधीपक्षांकडून चांगलीच टीका होते आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयावर बोलताना महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवण्याची योजना असल्याचं म्हटलं आहे. शिवसेनेने आजच्या सामना अग्रलेखातून सरकारी निर्णयावर टीका करणाऱ्या भाजपवर ताशेरे ओढले आहेत.
ADVERTISEMENT
सरकारने वाईन विक्रीसाठी सुपर मार्केट खुले केलेले असताना महाराष्ट्र मद्यराष्ट्र होईल असे बरळणे म्हणजे झिंगलेल्या मनोवृत्तीचे लक्षण आहे. हा महाराष्ट्राच्या संस्कारांचा अपमान आहे. दारु म्हणजे औषध आहे, थोडी थोडी पिया करो…असा मंत्र चार दिवसांपूर्वी भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंग यांनी दिला आहे. त्यावर हे झिंगाडे काय बोलणार आहेत? असा सवाल आजच्या अग्रलेखातून विचारण्यातत आला आहे.
शाळेत खिचडीऐवजी वाईन द्या अन् मंदिरातही व्यवस्था करा; बंडातात्या कराडकरांचे सरकारला टोले
हे वाचलं का?
वाईन आणि दारु यांच्यातला फरक विरोधी पक्षाला चांगलाच माहिती आहे. तरीही वाईन चढल्यासारखे विरोधी पक्ष सरकारच्या निर्णयाविरोधात बोंब मारत आहेत. १ हजार चौरस फुटापेक्षा जास्त जागा असलेल्या ठिकाणी वाईन विक्रीला परवानगी दिल्यानंतर भाजप नवसारीची देशी दारु प्यायलाप्रमाणे बरळू लागला आहे. सरकारचा हा निर्णय महाराष्ट्राचं मद्यराष्ट्र करणारा आहे असं म्हणत फिरणं म्हणजे आपल्या उरल्यासुरल्या अकलेचे दिवाळे काढण्यासारखं आहे, अशीही टीका शिवसेनेने केली आहे.
दारूची खुलेआम विक्री होणार असेल तर गांजाच्या शेतीलाही संमती द्या-संभाजी भिडे
ADVERTISEMENT
सरकारने हा निर्णय राज्यातील फलोत्पादन करणारे शेतकरी, द्राक्ष बागायतदार, वाईन उद्योगाला चालना देण्यासाठी घेतला. यात नाक मुरडण्यासारखं काय आहे? देवेंद्र फडणवीसांनी गोव्यात बसून या निर्णयाला विरोध करावा हे आश्चर्यकारकच म्हणावे लागेल. ज्या राज्यात फक्त दारुचेच धबधबे वाहत आहेत अशा राज्याचे फडणवीस प्रभारी आहेत.
ADVERTISEMENT
शेतकऱ्यांच्या मुलांना दारुच्या नादी लावणार आहात का?; चंद्रकांत पाटलांचा सरकारला सवाल
भाजपशासित सर्वच राज्यांमध्ये दारुविक्रीसंदर्भात मवाळ धोरण का स्विकारलं आहे याचंही उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी द्यावं अशी मागणी शिवसेनेने आजच्या अग्रलेखातून केली आहे. नाशिकची वाईनचे ब्रँडींग करण्यासाठी केंद्र सरकार मदत करते आहे. नाशिकमध्ये वाईन टुरिजमला मान्यता मिळावी अशी केंद्राची योजना आहे. त्यामुळे आता केंद्राला हिंदुस्थानाचं मद्यराष्ट्र करायचंय असं भाजपवाले बोंबलत फिरणार का? शेजारच्या मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आहे, तिकडे शिवराजसिंग चौहान यांनी होम बार लायसन्सला परवानगी दिली आहे. त्यामुळे भाजप नेते आता मध्य प्रदेशलाही बेवड्यांना समर्पित करणार का असा खोचक सवाल आजच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.
वाईन उद्योजकासोबत कुणाची बैठक झाली?; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT