Aditya Thackeray : अब्दुल सत्तार फक्त दुसऱ्यांची खिल्ली उडवतात, कृषीमंत्री कोण हे शेतकऱ्यांना ठाऊक नाही
आदित्य ठाकरे हे अकोला दौऱ्यावरती आहेत. यावेळी त्यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तावर यांच्यावर निशाणा साधला आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार केवळ दुसऱ्यांची खिल्ली उडवतात. त्यांना तेवढंच येतं. विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. यावर अंकुश लावण्यासाठी सरकारकडून कोणतीही हालचाल होताना दिसत नाहीये. राज्यात कृषिमंत्री कोण आहे हे देखील शेतकऱ्यांना माहित नाही. महाराष्ट्राला कृषीमंत्री आणि उद्योग मंत्री आहेत […]
ADVERTISEMENT
आदित्य ठाकरे हे अकोला दौऱ्यावरती आहेत. यावेळी त्यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तावर यांच्यावर निशाणा साधला आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार केवळ दुसऱ्यांची खिल्ली उडवतात. त्यांना तेवढंच येतं. विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. यावर अंकुश लावण्यासाठी सरकारकडून कोणतीही हालचाल होताना दिसत नाहीये. राज्यात कृषिमंत्री कोण आहे हे देखील शेतकऱ्यांना माहित नाही. महाराष्ट्राला कृषीमंत्री आणि उद्योग मंत्री आहेत की नाही आहे. त्यामुळे कृषीमंत्री आणि उद्योग मंत्र्यांचा आदित्य ठाकरे यांनी राजीनामा मागितला आहे. कृषीमंत्री राजकारणात मजा उडवत आहेत आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचे हाल होत आहे अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
आदित्य ठाकरे रणछोडदास असल्याची टीका
आदित्य ठाकरे हे रणछोडदास असल्याची टीका शिंदे गटातर्फे करण्यात आली होती. तर औरंगाबाद शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी हे आरोप फेटाळून लावले. आदित्य ठाकरेंची सभा ठरलीच नव्हती. ते फक्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करणार होते, असं वक्तव्य खैरे यांनी केलं.राज्यात यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. मात्र या घटनाबाह्य सरकारने काहीच केलेलं नाही, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी यापूर्वी घेतलेल्या सभांमधून केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री फक्त कार्यक्रम घेण्यात मग्न आहेत, मात्र सामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांना वेळ नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये वारंवार आदित्य ठाकरे यांना वरळीतून राजीनामा देऊन निवडणूक लढण्याचे आव्हान देणारे शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघात आज हायव्होल्टेज राजकीय लढाई पाहायला मिळणार आहे. शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे कुटुंब विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा राजकीय सामना बघायला मिळत आहे. या वादाच्या नव्या अंकाला आता सुरुवात होणार असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे दोन तरुण नेते आमने-सामने येणार आहेत. सिल्लोडमध्ये हे दोन्ही नेते आमनेसामने येतील.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT