वाळू तस्करावर कारवाई करणाऱ्या महसूल अधिकाऱ्याला शिवसेना आमदाराचा दम
अकोल्यातील बाळापूर मतदार संघाचे शिवसेना आमदार नितीन देशमुख हे चर्चेत आले आहेत. वाळु तस्करावर कारवाई केल्याप्रकरणी तहसीलदाराला दमदाटी केल्यानंतर मनस्थिती खराब झालेल्या अधिकाऱ्याने थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे रजेचा अर्ज केला आहे. त्यामुळे तस्करांवर कारवाई करत असताना लोकप्रतिनिधींकडून जर दबाव टाकला जात असेल तर कारवाई करायची तरी कशी असा प्रश्न आता विचारला जात आहे. तहसीलदार योगेश कोटकर यांनी […]
ADVERTISEMENT
अकोल्यातील बाळापूर मतदार संघाचे शिवसेना आमदार नितीन देशमुख हे चर्चेत आले आहेत. वाळु तस्करावर कारवाई केल्याप्रकरणी तहसीलदाराला दमदाटी केल्यानंतर मनस्थिती खराब झालेल्या अधिकाऱ्याने थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे रजेचा अर्ज केला आहे. त्यामुळे तस्करांवर कारवाई करत असताना लोकप्रतिनिधींकडून जर दबाव टाकला जात असेल तर कारवाई करायची तरी कशी असा प्रश्न आता विचारला जात आहे. तहसीलदार योगेश कोटकर यांनी दिलेल्या रजेच्या अर्जामुळे सध्या अकोल्याच्या प्रशासकीय यंत्रणेत चर्चांना उधाण आलं आहे.
ADVERTISEMENT
बाळापूरचे तहसीलदार डी.एल.मुकुंद हे वैद्यकीय रजेवर असल्यामुळे अतिरीक्त नायब तहसिलदार सुरडकर यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. परंतू या पदावर काम करत असताना होत असलेल्या जाचाला कंटाळून त्यांनी वरिष्ठांकडे अर्ज करत आपली बदली करवून घेतली. यानंतर या पदाचा कार्यभार योगेश कोटकर यांच्याकडे सोपवण्यात आला. कोटकर यांच्याकडे कार्यभार आल्यानंतर त्यांनी बाळापूरमधील वाळु तस्करीवर वचक रहावा यासाठी भरारी पथकाची स्थापना करुन कारवाईला सुरुवात केली. कोटकर यांनी पहिल्या १० ते १२ दिवसांमध्ये कामाचा धडाका दाखवत वाळु तस्करांसह अवैध खनिज माफीयांवर कारवाई केली.
आर्वी गर्भपात प्रकरण : डॉक्टरच्या घरात सापडली तब्बल 97 लाखांची रोख रक्कम
हे वाचलं का?
परंतू यानंतर आमदार नितीन देशमुख यांनी कोटकर यांना फोन करत संबंधित व्यक्तीवर कारवाई का केली म्हणून दम भरला. वाहन जप्त केल्यामुळे दरदिवसाला होणारं पाच हजाराचं नुकलान हे तुमच्या पगारातून कापून घ्यायचं का असा धमकीवजा इशारा आमदार देशमुखांनी दिल्याचं तहसीलदारांचं म्हणणं आहे. आमदार देशमुखांकडून कारवाई न करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचंही तहसीलदारांनी आपल्या अर्जात म्हटलं आहे. अधिकारी करत असलेल्या प्रशासकीय कामात लोकप्रतिनीधींकडून येणाऱ्या दबावामुळे बाळापूर येथील कर्मचाऱ्यांमध्ये धास्तीचं वातावरण असून सर्व अधिकारी रजेवर जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते आहे.
बीड : भाजप आमदाराच्या पतीला जिवे मारण्याची धमकी, शिपायाच्या गळ्याला चाकू लावून लुटलं
ADVERTISEMENT
आमदार नितीन देशमुख यांच्याशी मुंबई तक ने फोनवर संपर्क साधला असता त्यांनी हे आरोप फेटाळले आहेत. रेती वाहतुकीची रॉयल्टी असूनही महसुल अधिकारी चुकीच्या पद्धतीने कारवाई करत आहेत. याबद्दलच्या तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या, असं असताना मी त्या अधिकाऱ्यांची आरती नाहीच ओवाळणार. अशा अधिकाऱ्यांना सज्जड इशारा देणं मला भागच आहे आता त्याला हे अधिकारी धमकी म्हणत असतील तर मी काहीही करु शकणार नाही अशी प्रतिक्रीया देशमुख यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT