राणेंवर टीका करताना Shivsena आमदारांची जीभ घसरली, म्हणाले…घरात घुसून कोथळा बाहेर काढू !
मुख्यमंत्री नारायण राणेंविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरुद्ध आज पोलिसांनी अटकेची कारवाई केली. मंगळवारी दिवसभर राज्यभरात शिवसेना कार्यकर्त्यांनी राणेंविरुद्ध निदर्शनं केली. अनेक शिवसेना नेत्यांनीही राणेंचा आज चांगला समाचार घेतला. परंतू नारायण राणेंवर टीका करत असताना हिंगोलीच्या कळमनुरी मतदार संघाचे आमदार संतोष बांगर यांची जीभ घसरली. हिंगोलीत नारायण राणेंच्या पुतळ्याची अंत्ययात्रा काढल्यानंतर संतोष बांगर […]
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री नारायण राणेंविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरुद्ध आज पोलिसांनी अटकेची कारवाई केली. मंगळवारी दिवसभर राज्यभरात शिवसेना कार्यकर्त्यांनी राणेंविरुद्ध निदर्शनं केली. अनेक शिवसेना नेत्यांनीही राणेंचा आज चांगला समाचार घेतला. परंतू नारायण राणेंवर टीका करत असताना हिंगोलीच्या कळमनुरी मतदार संघाचे आमदार संतोष बांगर यांची जीभ घसरली.
ADVERTISEMENT
हिंगोलीत नारायण राणेंच्या पुतळ्याची अंत्ययात्रा काढल्यानंतर संतोष बांगर यांनी राणेंना धमकीवजा इशाराच दिला. यावेळी बोलत असताना संतोष बांगर यांनी नारायण राणेंची तुलना कुत्र्याशी केली. “नारायण राणे हा हरामखोर, कोंबडीचोर आहे. राणेंना मला सांगायचं तुम्हाला कोकणात नाकारलं, मुंबईत नाकारलं…निवडणुकीत तुम्ही चारीमुंड्या चीत झालात. आता या बेईमान जनता पार्टीने लोकांच्या अंगावर सोडायला जसा कुत्रा ठेवतात तसं तुम्हाला ठेवलं आहे. मला भारतीय जनता पार्टीलाही सांगायचंय की तुम्ही हे जे कुत्र पाळलं आहात ते तुम्हालाडी डसल्याशिवाय राहणार नाही. हे कुणाचचं झाली नाही ते तुमचं कुठून होणार आहे?”
यापुढे बोलत असताना संतोष बांगर यांनी राणेंना थेट धमकी दिली. “सूर्यावर थुंकल्यामुळे काही होत नाही. दोन्ही हातांनी सूर्याला झाकण्याचा प्रयत्न केला तरीही काही होत नाही. महाराष्ट्रातच नाही तर देशभरात आणि परदेशातही सर्वात चांगलं काम करणारे मुख्यमंत्री कोण असतील तर ते उद्धव ठाकरे आहेत. त्यांच्या चपलेजवळ बसायची तुझी लायकी नाही. मला राणेंना संदेश द्यायचाय, तू काय सांगतोस की कुठे यायचं. तुझ्या घरात घुसून मारण्याची ताकद आमच्यात आहे. पोलीस संरक्षण बाजूला ठेव…या संतोष बांगरने तुझा कोथळा बाहेर नाही काढला तर माझं नाव नाही.”
हे वाचलं का?
नारायण राणेंनी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर भाजपने या विधानाशी आपण सहमत नसल्याचं सांगत नारायण राणेंवर केलेल्या कारवाईला सुडबुद्धीची कारवाई म्हणत आपण त्यांच्या पाठीमागे असल्याचं सांगितलं. त्यामुळे शिवसेना पक्ष आता संतोष बांगर यांच्या विधानावर काय भूमिका घेतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT