Sanjay Raut Rockstar शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांचं वक्तव्य

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेना खासदार संजय राऊत हे रॉकस्टार आहेत असं वक्तव्य शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी पुण्यात केलं आहे. शिवसेना पक्षाकडून राज्यभरात शिव संपर्क अभियान उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमाच्या शुभारंभ उर्मिला मार्तोंडकर यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आला. त्यावेळी प्रसार माध्यमां सोबत त्यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांना भाजपच्या नेत्या चित्रा वाघ ह्या शिवसेना नेते संजय राऊत हे सोनिया सेनेचे प्रवक्ते आहेत असे त्यांनी म्हटले आहे याबाबत प्रतिक्रिया विचारली. त्याबाबत संजय राऊत हे रॉकस्टार आहेत इतर लोकांच्या टीकेवर चोरावर मोर करायला सक्षम आहेत असं म्हणत उर्मिला मातोंडकर यांनी प्रतिक्रिया दिली.

ADVERTISEMENT

अद्याप ही बारा आमदाराची यादी राज्यपालांमार्फत मान्य होत नाही. त्यावर उर्मिला मातोंडकर म्हणाल्या की, तो एक वेगळाच विषय आहे. राज्यपाल ती यादी करतील. तेव्हा करतील, त्यामुळे आपलं काम थांबत नाही. तसेच मी एखादी गोष्ट डोक्यात ठेवून राजकारणात आलेली नाही. जर राज्यपालांच्या नियुक्तीवर बोलायचं झाल्यास तोंडावर मास्क आहे, तोच बरा असल्याचे सांगितले. तसेच त्या पुढे म्हणाल्या की, जेव्हा 2019 मध्ये आपल्या राज्यात पूर आला. तेव्हा मी सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे चार दिवसाच्या दौर्‍यावर गेले होते. ही गोष्ट मी प्रसार माध्यमांना देखील सांगितली होती आणि त्यांनी माझे काम पाहिले आहे. तसेच हल्लीचे नेते एक केळं वाटतात आणि चार फोटो काढतात. अशा शब्दात चमकोगिरी नेत्यांनाही त्यांनी सुनावले.

महाराष्ट्रात लव्ह जिहादसारख्या गोष्टींना थारा नाही

हे वाचलं का?

राज्यात मागील दोन दिवसापासून लव्ह जिहाद सारखा प्रश्न चर्चेला आला आहे. त्या प्रकरणावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील भूमिका मांडली आहे. तसेच तुम्ही देखील मुस्लिम तरुणाशी लग्न केले होते. त्यावरून तुमच्यावर टीका झाली होती. त्या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, महाराष्ट्रामध्ये लव्ह जिहाद सारख्या घटनांना आजपर्यंत थारा दिलेला नाही. मुळात जो अन्याय असतो, तो सामाजिक असो किंवा आणखी कोणताही असू, त्यामुळे कोणत्याही जाती धर्मातील स्त्री किंवा पुरुषावर अन्याय होत असेल तर अंत्यत चुकीचे आहे. तसेच कोणत्याही प्रकारची बळजबरी, ती म्हणजे धर्मावर आली. तर ती प्रत्येकाची एक ओळखच आहे ना, अशी भूमिका त्यावर त्यांनी मांडली. तसेच आपण जे म्हणालात की, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भूमिका मांडली. त्याबद्दल मला माहिती नाही. त्यावर भाष्य करणे, उचित ठरणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT