Modi-Uddhav Meet : मिलना है, मेरे साथ और दो साथी हे, जाणून घ्या कशी घडली उद्धव ठाकरे आणि मोदींची भेट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

काही दिवसांपूर्वी दिल्ली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात मराठा आरक्षणाव्यतिरीक्त काही वेळ वैयक्तिक चर्चा झाली. या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं. शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येऊ पाहत आहेत का? असा सवाल विचारला जाऊ लागला. या सर्व प्रश्नांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोक उत्तरं दिली आहेत.

ADVERTISEMENT

युतीच्या सरकारमध्ये Shivsena गुलाम होती-संजय राऊत

संजय राऊत आपल्या सदरात लिहीतात, “शनिवारी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना फोन लावला आणि मराठा आरक्षणासंदर्भात तुमची भेट हवी आहे असं सांगितलं. मोदींनीही उद्धव ठाकरेंची चौकशी करत राज्याची ख्यालीखुशाली विचारली. यावेळी उद्धव ठाकरे गमतीमध्ये अब मेरे साथ दो और साथी हे, उनको भी साथ लाना है असं म्हणाले, ज्यावर पंतप्रधान मोदींनी लगेच वेळ देऊन बुधवारी भेटीची वेळ नक्की केली. कोणत्याही मथ्यस्थीशिवाय मोदी-ठाकरे भेट झाली हे महत्वाचे. महाराष्ट्राचा प्रश्न घेऊन पंतप्रधानांना भेटणं यात काही गैर नाही. सध्या पश्चिम बंगाल आणि केंद्राचा टोकाचा संघर्ष सुरु आहे. अशावेळी राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींना भेटले आणि मराठा आरक्षणावर चर्चा झाली हे महत्वाचे.”

हे वाचलं का?

या भेटीनंतर भाजप नेत्यांनी प्रतिक्रीया देत शिवसेनेशी पुन्हा मैत्रीसाठी तयार असल्याचं सूचक वक्तव्य केलं. भाजप नेत्यांचा समाचार घेत असताना राऊतांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनत असताना पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला नाही. याचा अर्थ महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी कधीच समजून घेतला नाही. ३० मिनीटांच्या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात काहीतरी बदल होतील असं काहींना वाटतंय आणि त्यात भाजपचे नेते आघाडीवर आहेत असा टोलाही राऊत यांनी लगावला.

महाराष्ट्रातील राजकारणात उलथापालथ होईल आणि राजकीय समीकरणं बदलतील अशा पुड्या अधुनमधून सोडल्या जात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर या पुड्या अधिक गरम झाल्या आहेत. पण यात कोणतंही तथ्य नाही. मुख्यमंत्री ठाकरे आणि दिल्लीतला संवाद वाढला आहे आणि तो थेट पंतप्रधान मोदीं यांच्याशी आहे, असं म्हणत राऊतांनी राज्यातील भाजप नेत्यांना सूचक इशारा दिला आहे.

ADVERTISEMENT

‘कुणी कितीही स्ट्रॅटेजी करो, कुणाचीही भेट घेओ.. 2024 मध्येही मोदीच पंतप्रधान असतील’

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT