शिवसेनेसारखं काम कोणालाच जमलं नाही, म्हणून तिकडे चिता पेटल्या आहेत ! – संजय राऊत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरुन राज्यात प्रत्येक दिवशी सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना पहायला मिळतो आहे. भाजप प्रत्येक दिवशी राज्यातील आरोग्य व्यवस्थेवरुन सरकारला कोंडीत पकडत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून संजय राऊतही सरकारची बाजू जोरदार मांडताना दिसत आहेत. महाराष्ट्र पॅटर्नची चर्चा गेल्या महिन्याभरापासून सुरु आहे. राज्यात सरकारने जे काम केलंय त्याचं कौतुक मोदींनीही केलं. शिवसेनाही या लढाईत उतरली आहे. बाकीच्या राज्यांत सेनेसारखं काम कोणालाच जमलं नाही म्हणून आज तिकडे चिता पेटलेल्या दिसत आहेत असं संजय राऊत म्हणाले.

ADVERTISEMENT

“महाराष्ट्रात राजकीय कार्यकर्ते सरकारला समांतर अशी एक व्यवस्था चालवत आहे. आज मी आदित्य ठाकरेंसोबत पुण्यात ३ कोविड सेंटरचं उद्घाटन करुन आलोय. ही सेंटर सरकारी नाही तर शिवसेनेने चालवली आहेत. इतर राज्यातील पक्षांना हे जमलेलं नाही म्हणूनच आज तिकडे चिता पेटलेल्या दिसत आहेत, कब्रस्तानाच मृतदेह पुरायला जागा मिळत नाहीये”, अशा शब्दांत राऊतांनी सरकारचं कौतुक केलं आहे.

पुणे : पुरंदर आश्रम शाळेतील १९ मुलांना कोरोनाची लागण

हे वाचलं का?

दरम्यान यावेळी राऊत यांनी विरोधीपक्षालाही टोला लगावला आहे. “कोरोनाविरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र आघाडीवर आहे आणि राज्य आपली लढाई स्वबळावर लढत आहे. महाराष्ट्र पॅटर्नचं सध्या सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. खुद्द पंतप्रधान मोदींनीही याबद्दल आता बोलायला सुरुवात केली आहे. त्यामुळे याचं श्रेय हे मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनाच जातं. त्यामुळे राज्यातले विरोधी पक्ष जे काही आरोप करत आहेत त्यांना उत्तर खुद्द मोदींनीच दिलं आहे.” यादरम्यान संजय राऊतांनी पाच राज्यांच्या निवडणूक निकालावरही भाष्य केलं.

चिंता व्यक्त व्हावी असंच वातावरण सध्या देशात आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली ही आघाडी आहे आणि काँग्रेसला जेव्हा अपयश येतं तेव्हा चिंता ही वाटणारच. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी मारलेली मुसंडी ही जबरदस्त आहे. भविष्यात देशात अशी आघाडी तयार व्हावी अशी सर्वांचीच इच्छा आहे. या आघाडीचा आत्मा हा काँग्रेस पक्षच असेल. आसाम, केरळ, तामिळनाडूत काँग्रेसला चांगलं यश आलंय पण त्यांना अजुन मुसंडी मारण्याची गरज असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT