देवाच्या चरणी तरी खरे बोला! शिवसेनेचा देवेंद्र फडणवीस यांना टोला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी शिर्डीला गेले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली होती. राजकारण गेलं चुलीत मात्र राज्यातले गव्हर्नन्स ठीक राहिले पाहिजे. महाराष्ट्राची ही अवस्था कधीही पाहिली नव्हती असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

ADVERTISEMENT

त्यांच्या याच वक्तव्याचा समाचार आता सामनाच्या अग्रलेखातून घेण्यात आला आहे. तसंच किमान देवाच्या चरणी तरी खरे बोला असं म्हणून त्यांना टोलाही लगावण्यात आला आहे. तसंच किरीट सोमय्यांचा उल्लेख भाजपचे युगपुरूष असाही करण्यात आला आहे.

‘मातोश्री’, डायरी अन् 2 कोटी रुपयांचं गिफ्ट.. पाहा फडणवीस काय म्हणाले!

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात?

भाजपने काय करावं किंवा काय करू नये? हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. पण त्या मंडळींनी किमान महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेशी खेळू नये. विरोधकांकडून रोजच नवनवीन पद्धतीने आरोप करून सरकारची प्रतिमा मलिन करण्याचे काम सुरू असल्याची खंत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाची तीच खंत आहे. विरोधी पक्षाच्या बेबंद वृत्तीमुळे राज्य बदनाम व्हावे आणि त्या बदनामीचा आनंदोत्सव साजरा करावा हे चांगले नाही.

ADVERTISEMENT

वळसे पाटील यांचे म्हणणे आहे की पेन ड्राईव्ह ही आता नवीन पद्धत निघाली आहे. खोटे आरोप करायचे, केंद्रीय तपास यंत्रणांची भीती दाखवायची, भ्रष्टाचाराचे आरोप करत संबंध नाही त्यांच्यांशी संबंध जोडायचे , एकीकडे कायदा सुव्यवस्था अडचणीत आहे असे म्हणायचे आणि दुसरीकडे छोट्या छोट्या गोष्टींवरून मोर्चे काढून तो प्रश्न निर्माण करायचा असे उपद्व्याप सुरू आहेत असंही वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

मुख्यमंत्र्यांजवळ जे टोमणे बॉम्ब आहेत त्याच्यापेक्षा खतरनाक बॉम्बच उरलेला नाही: फडणवीस

ज्यांच्या स्वतःवरच भ्रष्टाचाराचे, जमीन घोटाळ्याचे आरोप आहेत असे भाजपचे युगपुरूष किरीट सोमय्या हे हाती कागदी हातोडा घेऊन मुंबईतून भाडोत्री लोक नेऊन कोकणातील शांतता भंग करत आहेत. अशा मनोविकृतांच्या डोक्यावर कितीही हातोडे मारले तरीही त्यांचा मेंदू काही ठिकाणावर येत नाही. युगपुरूष सोमय्या अनधिकृत की काय ते रिसॉर्ट तोडायला निघाले यावर देवेंद्र फडणवीस काय बोलणार आहेत? काहीही बोला पण खरे बोला.

देवेंद्र फडणवीस हे शिर्डीत साईचरणी गेले, त्यानंतर म्हणाले की राजकारण गेलं चुलीत, मात्र इथलं गव्हर्नन्स ठीक राहिले पाहिजे त्याला बट्टा लागला आहे. ही अवस्था महाराष्ट्रात कधीही पाहिली नव्हती असे शहाणपणाचे उद्गार देवेंद्र फडणवीस यांनी काढले. पण महाराष्ट्राची इज्जत आणि गव्हर्नन्स चुलीत घालण्याचे काम देवेंद्र फडणवीस स्वतःच करत आहेत आणि त्या चुलीची शेकोटी घेत बसले आहेत. महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्याचे गुड गव्हर्नन्स हे नक्कीच नाही. विरोधी पक्षातले फुटकळ लोक प्रशासनातील अधिकाऱ्यांवर खोटे आरोप करून त्यांची प्रतिमा मलीन करतात तेव्हा महाराष्ट्र चुलीत गेलेला चालतो का? शरद पवारांसारखा नेता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सांगलीतील स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्यास जाण्याच्या आधी विरोधी पक्षनेत्यांचे पंटर्स कार्यक्रमात गोंधळ घालतात हा कसला गुड गव्हर्नन्स? असाही सवाल या अग्रलेखात विचारण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT