Manisha Kayande : मुली, महिला असुरक्षित अन् निर्भया पथकं फुटीर आमदारांच्या दिमतीला?
मुंबई : उद्धव ठाकरे सरकारने राज्यातील मुली, महिलांच्या सुरक्षिततेसाठी नेमलेली निर्भया पथके शिंदे सरकार आल्यापासून गायब आहेत. सध्या महिला सुरक्षा वाऱ्यावर असून पथकातील गाड्या आणि कर्मचारी-अधिकारी शिंदे गटाच्या फुटीर आमदारांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत, असा आरोप शिवसेना (ठाकरे गट) प्रवक्त्या प्रा. डॉ. मनीषा कायंदे यांनी केला. त्या शिवसेना भवन येथील पत्रकार परिषदेमध्ये बोलत होत्या. […]
ADVERTISEMENT
मुंबई : उद्धव ठाकरे सरकारने राज्यातील मुली, महिलांच्या सुरक्षिततेसाठी नेमलेली निर्भया पथके शिंदे सरकार आल्यापासून गायब आहेत. सध्या महिला सुरक्षा वाऱ्यावर असून पथकातील गाड्या आणि कर्मचारी-अधिकारी शिंदे गटाच्या फुटीर आमदारांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत, असा आरोप शिवसेना (ठाकरे गट) प्रवक्त्या प्रा. डॉ. मनीषा कायंदे यांनी केला. त्या शिवसेना भवन येथील पत्रकार परिषदेमध्ये बोलत होत्या. यावेळी खासदार प्रियांका चतुर्वेदी, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर याही उपस्थित होत्या.
ADVERTISEMENT
लेकी, आया-बहिणी यांची सुरक्षा काढून घेऊन आमदारांवर पाळत ठेवण्यासाठी वापरणाऱ्या शिंदे सरकारचं सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? जनता सोबत असल्याचं, आमदार सोबत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतात. मग आमदारांना जनतेपासून भीती वाटते म्हणून सुरक्षा हवी का? की, तुम्हाला आमदार पळून जातील, याची भीती वाटते म्हणून पाळत ठेवताय? प्रत्येक फुटीर आमदार आणि खासदारांच्या दिमतीला पाच पोलिसांची वाय प्लस दर्जाची सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. आपल्या माता-भगिनींनी सुरक्षा काढून घेऊन ते स्वतः वापरत आहेत. हे मावळे इतके घाबरट, भित्रे आहेत का? असे काही रोखठोक सवाल मनिषा कायंदे यांनी यावेळी विचारले.
मनिषा कायंदे पुढे म्हणाल्या, केंद्रातील तत्कालीन यूपीए सरकारने महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि महिला अत्याचाराचे गुन्हे रोखण्यासाठी निर्भया निधी तयार केला होता. उद्धव ठाकरे सरकारने राज्यात महिलांच्या दिमतीला निर्भया पथके देऊन त्यांचे जीवनमान सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिंदे सरकारने फुटीर आमदारांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी निर्भया वाहनांचा वापर सुरू केला आहे. तुमच्यासारखेच आता तुमच्या गटात आलेले आमदार गुवाहाटी किंवा इतरत्र पळून जायची भीती वाटत आहे का?असा सवालही त्यांनी केला.
हे वाचलं का?
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विरारनजीक परवा एका १९ वर्षीय मातेच्या १० वर्षांच्या बाळाचा बळी गेला. त्याला शिंदे सरकार जबाबदार असल्याचा आरोप यावेळी मनीषा कायंदे यांनी केला. टॅक्सीमध्ये छेडछाड रोखण्यासाठी या मातेने बाळासह धावत्या टॅक्सीतून बाहेर उडी घेतली. त्यात दुर्दैवाने बाळाचा मृत्यू झाला आणि महिला गंभीर जखमी झाली. टॅक्सीमधील संकटकाळी मदतीचे पॅनिक बटन कुठे आहे? पोलिस कंट्रोल कक्षाला केलेले कॉल उचलायला कुणी नाही. आज जर निर्भया पथक महिला सुरक्षेत तैनात असते, तर या मातेच्या बालकाचा जीव वाचू शकला असता, असेही त्यांनी म्हटलं.
फुटीर आमदारांच्या सुरक्षेपेक्षा शिंदे सरकारला राज्यातील माता-भगिनींची, जनतेची सुरक्षा जास्त महत्वाची वाटत नाही का? असेल तर, आमदारांची सुरक्षा आणि त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी वापरली जात असलेली निर्भया वाहने तात्काळ पोलीस स्टेशनला जमा करावीत, अशी मागणीही मनीषा कायंदे यांनी केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT