Nana Patole काय बोलतात, कसे डोलतात यावर सरकारचं भवितव्य अवलंबून नाही – शिवसेना

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गेल्या काही दिवसांपासून राज्यात स्वबळाची भाषा करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आज सामना अग्रलेखातून खास समाचार घेण्यात आला आहे. नाना रांगडे गडी आहेत, ते काय बोलतात कसे डोलतात यावर सरकारचं भवितव्य अवलंबून नाही असं म्हणत शिवसेनेने नाना पटोलेंचं कौतुक करुन त्यांना कानपिचक्याही दिल्या आहेत.

ADVERTISEMENT

काँग्रेस कार्यकर्त्यांत उर्मी आली का?

नानांच्या बोलण्यामुळे दोन दिवस राजकारणात गरमी आली, पण काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उर्मी आली का? कधी कधी लहान माणसे त्यांच्या बोलण्याने राजकारण ढवळून काढतात, नानांनीही तेच केलं. नानांच्या बोलण्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याचं चित्र विरोधकांनी निर्माण केलं, पण नानांचा खरा रोख हा भाजपवर आहे. भाजपशी आमचे जमणार नाही, भाजपला मदत होईल असे काही करणार नाही असं नाना सांगत आहेत. त्यावर कोणी लक्ष देत नाही. नानांनी त्यांच्या मन की बात सांगितली. त्या मन की बात ने थोडी खळबळ माजली, ठीक आहे, होऊ द्या खळबळ असं म्हणत शिवसेनेने पटोलेंना चिमटा काढला आहे.

हे वाचलं का?

नाना काय बोलतात यावर सरकारचं भवितव्य अवलंबून नाही –

नानांच्या वक्तव्यांमुळे काँग्रेसला बळ मिळालं असेल तर ते बरच आहे. नानांनी स्वबळाचा नारा याआधी दिलाच आहे व त्यात काही चुकीचे वाटत नाही. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आपल्या शैलीनुसार स्वबळाला उत्तर दिलं आहे. नाना काय बोलतात, कसे डोलतात यावर सरकारचं भवितव्य अवलंबून नाही. हे सरकार उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या मर्जीने चालत आहे.

ADVERTISEMENT

काँग्रेस अनेक राज्यांमध्ये मृतपाय, नानांकडे संजीवनी गुटिका आहे का?

ADVERTISEMENT

अग्रलेखात नाना पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याविषयी शिवसेनेने खास शैलीत टोलेबाजी केली आहे. “महाराष्ट्र काँग्रेसला संजीवनी द्यायची आणि स्वबळावर काँग्रेसला सत्तेत आणायचं असा विडाच नानांनी उचलला आहे. त्यांच्या हिंमतीला दाद द्यावी लागेल. नानांकडे संजीवनी गुटिका किंवा विद्या आहे व त्यामुळे ते काँग्रेसला जागं करुन पुढे नेणार आहेत का? या संजीवनी गुटिकेची माहिती त्यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना दिली आहे का? अनेक राज्यांत काँग्रेस मृतप्राय होऊन बसली आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यात जाऊन नानांना ही संजीवनी गुटिका द्यावीच लागेल.”

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT