भास्कर जाधव यांना मीडियाशी बोलताना आलं रडू म्हणाले, “माझ्या पाठिशी…”
राकेश गुडेकर, प्रतिनिधी, रत्नागिरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, त्यानंतर भास्कर जाधव यांचं आज चार दिवसांनी मुंबईहून चिपळूण येथे कोकण रेल्वेने आगमन झालं. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते, यावेळी कार्यकर्त्यांकडून त्यांचं भव्य स्वागत केलं. यावेळी कार्यकर्त्यांचे प्रेम पाहून भास्कर जाधव यांना अश्रू […]
ADVERTISEMENT
राकेश गुडेकर, प्रतिनिधी, रत्नागिरी
ADVERTISEMENT
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, त्यानंतर भास्कर जाधव यांचं आज चार दिवसांनी मुंबईहून चिपळूण येथे कोकण रेल्वेने आगमन झालं. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते, यावेळी कार्यकर्त्यांकडून त्यांचं भव्य स्वागत केलं. यावेळी कार्यकर्त्यांचे प्रेम पाहून भास्कर जाधव यांना अश्रू अनावर झाले.
भास्कर जाधव यांनी काय म्हटलं आहे?
यावेळी बोलताना आ भास्कर जाधव म्हणाले की 40 वर्ष मी राजकरणात आहे आणि 40 वर्ष अनेक संकट पाहिली. ज्या ज्या वेळी आघात होतो, त्यावेळी माझे सहकारी अशाच प्रकारे पाठीशी उभे असतात. मला कधी ही गर्दी उभी करावी लागत नाही. एकदा का मी भूमिका घेतली की त्याच्या दुष्परिणामांची मी पर्वा करत नाही, असं भास्कर जाधव यावेळी म्हणाले.
हे वाचलं का?
निलेश राणेंच्या टीकेला उत्तर देणं भास्कर जाधव यांनी टाळलं
तसेच भाजपा नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी भास्कर जाधव यांच्या कारकिर्दीबाबत केलेल्या वक्तव्यावर भास्कर जाधव म्हणाले, मी दरेकर यांना शुभेछा देतो. भास्कर जाधव याची कारकीर्द लवकरात लवकर संपणार असेल, तर शेवटी नियतीच्या मनात असेल ते घडेल. पण भास्कर जाधव यांची कारकीर्द सन्मानाने आणि वाघाच्या डरकाळीने संपेल, असा टोला त्यांनी दरेकर यांना लगावला. तसेच माजी खासदार नीलेश राणे यांच्या टीकेला उत्तर देण्याचं भास्कर जाधव यांनी यावेळी टाळलं.
भाजपमधले कुवत नसलेले लोक उद्धव ठाकरेंवर टीका करत आहेत
भाजपतील कुवत नसलेल्या लोकांकडून उद्धव ठाकरेंवर टीका केली जात असल्याचं भास्कर जाधव यावेळी म्हणाले. “गेल्या अडीच वर्षांपासून भाजपच्या कुवत नसलेल्या, अधिकार नसलेल्या, ज्यांनी उद्धव ठाकरेंवर बोलायलाच नको होतं असे, सुसंस्कृत, सभ्य, पार्टी विथ डिफरन्स असं सांगणाऱ्या पक्षातले खालच्या थरातले कार्यकर्ते उद्धव ठाकरेंवर टीका करत होते. त्याच वेळी माझ्या आतला कार्यकर्ता तळमळत होता. कारण मी बाळासाहेबांची शिवसेना पाहिली आहे”, असं भास्कर जाधव यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT
भास्कर जाधव यांच्यावर एकनाथ शिंदेंच्या विरोधात बोलल्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे. तसंच त्यांच्या घरावर हल्लाही करण्यात आला. त्यानंतर चार दिवसांनी म्हणजेच आज भास्कर जाधव चिपळूणमध्ये पोहचले. मीडियाशी बोलत असताना त्यांना अश्रू अनावर झाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT