नितीन राऊतांच्या वक्तव्यामुळे नागपुरात व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम, पोलीस कारवाईमुळे तणावाचं वातावरण
राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने विकेंड लॉकडाउनची घोषणा केली. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद राहणार आहेत. परंतू नागपुरामध्ये आज व्यापाऱ्यांनी आपली दुकानं उघडल्यानंतर पोलीस कारवाईदरम्यान तणावाचं वातावरण निर्माण झालं. पालकमंत्री नितीन राऊत यांच्या संभ्रमात टाकणाऱ्या वक्तव्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप असून भाजपनेही या प्रकरणात उडी घेतली असून नितीन […]
ADVERTISEMENT
राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने विकेंड लॉकडाउनची घोषणा केली. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद राहणार आहेत. परंतू नागपुरामध्ये आज व्यापाऱ्यांनी आपली दुकानं उघडल्यानंतर पोलीस कारवाईदरम्यान तणावाचं वातावरण निर्माण झालं. पालकमंत्री नितीन राऊत यांच्या संभ्रमात टाकणाऱ्या वक्तव्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप असून भाजपनेही या प्रकरणात उडी घेतली असून नितीन राऊत दिशाभूल करणारी वक्तव्य करत असल्याचा आरोप केलाय.
ADVERTISEMENT
राज्य शासनाच्या आदेशानुसार नागपूरमध्ये पोलिसांनी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं बंद करायला सुरुवात केली होती. तसेच विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींवरही कारवाई करण्यात येत होती. परंतू काही दिवसांपूर्वी नितीन राऊत यांनी सर्व दुकानं सामान्यपणे सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहतील असं म्हटलं होतं. राऊतांच्या या वक्तव्यानंतर नागपुरातील काही व्यापाऱ्यांनी आज आपली दुकानं उघडली. परंतू पोलिसांनी यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केल्यानंतर या परिसरात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान नागपूर महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण बी यांनी स्पष्टीकरण देत राज्य शासनाची नियमावली नागपुरात जशीच्या तशी लागू करण्यात आल्याचं स्पष्टीकरण दिलं.
हे वाचलं का?
परंतू याकाळात निर्माण झालेल्या संभ्रमामुळे इतवारी मार्केट परिसरात व्यापारी आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये तणावाचं वातावरण पहायला मिळालं. दरम्यान मध्य नागपूर विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार विकास कुंभारे यांनीही नितीन राऊतांवर टीका करत पालकमंत्री दिशाभूल करणारी वक्तव्य करत असल्याचा आरोप केलाय. याव्यतिरीक्त व्यापाऱ्यांमध्ये ३० एप्रिलपर्यंत दुकानं बंद राहिली तर व्यापार आणि धंदा करायचा कसा याबद्दल प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या या लॉकडाउनचा उप-राजधानीच व्यापाऱ्यांकडून विरोध होताना दिसत आहे.
उस्मानाबादेत Break The Chain च्या नियमांना वाटाण्याच्या अक्षता
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT