अमरावती जिल्ह्यात लसीकरणाची बिकट परिस्थिती, एक दिवस पुरेल एवढा साठा शिल्लक
देशभरात लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यात ४५ वर्षांच्या वर व्यक्तींना लस देण्याचं काम सुरु असताना महाराष्ट्रात मात्र सध्या लसीचा अपुरा पुरवठा हा मुद्दा चांगलाच गाजतोय. अनेक महत्वाच्या शहरांसह जिल्ह्यांमध्ये लसीचे डोस संपल्यामुळे नागरिकांना घरी परतावं लागत आहे. विदर्भातील अमरावती जिल्ह्यात लसीकरणाची परिस्थिती गंभीर असून फक्त एक दिवस पुरेल इतका साठा शिल्लक असल्याची माहिती समोर येते आहे. नागपूरमध्ये […]
ADVERTISEMENT
देशभरात लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यात ४५ वर्षांच्या वर व्यक्तींना लस देण्याचं काम सुरु असताना महाराष्ट्रात मात्र सध्या लसीचा अपुरा पुरवठा हा मुद्दा चांगलाच गाजतोय. अनेक महत्वाच्या शहरांसह जिल्ह्यांमध्ये लसीचे डोस संपल्यामुळे नागरिकांना घरी परतावं लागत आहे. विदर्भातील अमरावती जिल्ह्यात लसीकरणाची परिस्थिती गंभीर असून फक्त एक दिवस पुरेल इतका साठा शिल्लक असल्याची माहिती समोर येते आहे.
ADVERTISEMENT
नागपूरमध्ये चिंताजनक परिस्थिती, गेल्या 24 तासात ‘एवढ्या’ कोरोना रुग्णांचा मृत्यू
अमरावती जिल्ह्याला २ लाखांच्या वर कोरोना लसींचा साठा उपलब्ध झाला होता. यानंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरुवात झाली. परंतू ,सध्याच्या घडीला जिल्ह्यात फक्त १ दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रनमले यांनी दिली. त्यामुळे लसींचा पुरवठा वेळेत सुरु झाला नाही तर लसीकरणाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
हे वाचलं का?
अमरावती जिल्ह्याला मिळालेला लसींचा साठा –
-
कोवॅक्सिन – ३३ हजार ३१४
ADVERTISEMENT
कोविशिल्ड – १ लाख ६७ हजार ३८०
ADVERTISEMENT
एकूण लसीचा साठा – २ लाख ७ हजार १६०
आतापर्यंत झालेले एकूण लसीकरण –
-
आरोग्य कर्मचारी – २७ हजार ३१४
-
फ्रंट लाईन वर्कर – २३ हजार ५४
-
ज्येष्ठ नागरिक – १ लाख १९ हजार ५२१
-
इतर – ३७ हजार २९१
-
आतापर्यंत झालेलं एकूण लसीकरण – २ लाख ७ हजार १८०
सध्या अमरावती जिल्ह्यात फक्त ६ हजार ४८६ लस उपलब्ध आहेत. या लसींमध्ये फक्त एक दिवसाचं लसीकरण होऊ शकेल अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. दुसरीकडे अकोला जिल्ह्यातही लसीकरणाची काहीशी अशीच परिस्थिती आहे. अकोला जिल्ह्यात शहर आणि ग्रामिण असे मिळून ९३ लसीकरण केंद्र उभारण्यात आले. या ९३ पैकी ४३ लसीकरण केंद्र लस उपलब्ध नसल्यामुळे बंद आहेत. उर्वरित ५० केंद्रांमध्ये ९३०० लसीचे डोस शिल्लक आहेत. या साठ्यात अकोल्यात दोन दिवसांचं लसीकरण होईल अशी माहिती कळतेय, परंतू यानंतर लसीचा पुरवठा न झाल्यास लसीकरणाला ब्रेक लावला जाऊ शकतो. त्यामुळे राज्याला केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या हक्काच्या लसी कधी मिळतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT