Siddarth Shukla ची अखेरची इन्स्टाग्राम पोस्ट ठरतेय चर्चेत, ‘या’ व्यक्तींचे मानले होते विशेष आभार
अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं आज निधन झालं. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सिद्धार्थ काही औषधं घेऊन झोपला मात्र सकाळी तो उठलाच नाही. त्यामुळे सिद्धार्थला तातडीने रूग्णालयात नेण्यात आलं, मात्र रूग्णालयात पोहचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. कूपर रूग्णालयात सिद्धार्थला नेण्यात आलं होतं. मात्र रूग्णालयाने त्याला मृत घोषित केलं. सिद्धार्थ शुक्लाने इन्स्टाग्रावर केलेली अखेरची पोस्टही यानिमीत्ताने चर्चेत आली आहे. २४ ऑगस्टला […]
ADVERTISEMENT
अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं आज निधन झालं. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सिद्धार्थ काही औषधं घेऊन झोपला मात्र सकाळी तो उठलाच नाही. त्यामुळे सिद्धार्थला तातडीने रूग्णालयात नेण्यात आलं, मात्र रूग्णालयात पोहचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. कूपर रूग्णालयात सिद्धार्थला नेण्यात आलं होतं. मात्र रूग्णालयाने त्याला मृत घोषित केलं. सिद्धार्थ शुक्लाने इन्स्टाग्रावर केलेली अखेरची पोस्टही यानिमीत्ताने चर्चेत आली आहे.
ADVERTISEMENT
२४ ऑगस्टला सिद्धार्थने आपल्या इन्स्टाग्रामवर अखेरची पोस्ट केली होती. ज्यात त्याने कोविड योद्ध्यांचे आभार मानले होते. सध्याच्या खडतर काळात आपला जीव धोक्यात टाकून रुग्णांची काळजी घेणारे सर्व डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचं सिद्धार्थने कौतुक केलं होतं.
सिद्धार्थच्या अकाली जाण्याचा त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. बिग बॉस, बालिका वधू यासारख्या प्रसिद्ध शो च्या माध्यमातून सिद्धार्थ शुक्ला घराघरांत पोहचला होता. वयाच्या चाळीशीत असलेल्या सिद्धार्थ शुक्लाकडे सर्वजण फिट अभिनेता म्हणून बघायचे. सिद्धार्थला व्यायामाचीही विशेष आवड होती. म्हणूनच अशा गुणी अभिनेत्याच्या अकाली निधनामुळे सर्वांना धक्का बसला आहे.
हे वाचलं का?
Siddarth Shukla च्या निधनाची बातमी ऐकताच शेहनाझ गिलने अर्ध्यावर सोडलं शुटींग
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT