Sidharth Shukla : सिद्धार्थला डॉक्टारांनी वर्कआऊटबद्दल आधीच केलं होतं सावध
चित्रपटसृष्टीला गुरूवारी मोठा धक्का बसला. अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. सिद्धार्थच्या अचानक जाण्यानं बॉलिवूडसह त्यांच्या चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. ह्रदयविकाराने निधन झाल्यानं त्यांच्या रुटीनबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा होत असून, डॉक्टरांनीही त्याला वर्कआऊटबद्दल महत्त्वाचा सल्ला दिल्याची माहिती समोर आली आहे. सिद्धार्थ शुक्लाचं गुरूवारी (२ सप्टेंबर) निधन झालं. सिद्धार्थला व्यायामाची आवड असल्यानं […]
ADVERTISEMENT
चित्रपटसृष्टीला गुरूवारी मोठा धक्का बसला. अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. सिद्धार्थच्या अचानक जाण्यानं बॉलिवूडसह त्यांच्या चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. ह्रदयविकाराने निधन झाल्यानं त्यांच्या रुटीनबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा होत असून, डॉक्टरांनीही त्याला वर्कआऊटबद्दल महत्त्वाचा सल्ला दिल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
सिद्धार्थ शुक्लाचं गुरूवारी (२ सप्टेंबर) निधन झालं. सिद्धार्थला व्यायामाची आवड असल्यानं तो वर्कआऊट कधीच टाळायचा नाही. बुधवारीही (१ सप्टेंबर) सिद्धार्थ एका मीटिंग करून घरी परतला. रात्री ८ वाजता घरी पोहोचला. त्यानंतर १० वाजता तो व्यायामसाठी गेला. इमारतीच्या परिसरातच त्यांने जॉगिंग केली. जॉगिंगवरून आल्यानंतर त्याने जेवण केलं आणि झोपण्यासाठी गेला.
त्यानंतर सकाळी ३ वाजेच्या सुमारास त्याला छातीत त्रास होऊ लागला. त्याने याबद्दल त्याच्या आईला म्हणजे रिता शुक्ला यांना सांगितलं. त्यांनी सिद्धार्थ पाणी दिलं. पाणी सिद्धार्थ झोपला त्यानंतर तो उठलाच नाही.
हे वाचलं का?
सिद्धार्थ वर्कआऊटच्या वेळा कटाक्षाने पाळायचा. तो दररोज तीन तास वर्कआऊट करायचा. त्यांच्या वर्कआऊटच्या वेळेबद्दल डॉक्टरांनी त्याला आधीच सावध केलं होतं. डॉक्टरांनी सिद्धार्थ तसा सल्लाही दिला होता, असं त्यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलं.
डॉक्टरांनी सिद्धार्थला वर्कआऊटचा वेळ कमी करण्यास सांगितलं होतं. त्याचबरोबर सिद्धार्थला हळू चालण्याचाही सल्ला डॉक्टरांनी दिला होता, अशी माहिती सूत्रांनी ‘इंडिया टुडे’ला दिली.
ADVERTISEMENT
सिद्धार्थच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून काय आलं समोर?
ADVERTISEMENT
> पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी मृत्यूबद्दल कोणतंही मतं नोंदवलेलं नाही.
> सर्व अहवाल प्रलंबित आहेत आणि त्यामुळे डॉक्टरांनी कोणताही निष्कर्ष काढलेला नाही.
> सिद्धार्थचे व्हिसेरा सुरक्षित ठेवण्यात आले आहेत.
> हिस्टोपॅथोलॉजी स्टडी आणि केमिकल अॅनालिसेसद्वारा (Chemical Analysis) त्याच्या मृत्यूच्या कारणाचा शोध घेतला जाणार आहे.
> पोस्टमॉर्टम अहवालात सिद्धार्थच्या शरीरावर आणि शरीरात जखमा झाल्याच्या कोणत्याही खुणा आढळून आलेल्या नाहीत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT