Sidharth Shukla ने झोपण्याआधी घेतलेली काही औषधे, दुसऱ्या दिवशी…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: बिग बॉस या रियालिटी शोच्या 13 व्या सीझनचा विजेता आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं आज (2 सप्टेंबर) निधन झालं. सिद्धार्थ शुक्ला हा अवघ्या 40 वर्षांचा होता. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना त्याच्या मृत्यूच्या बातमीवर विश्वास ठेवणे खूप कठीण जात आहे. सिद्धार्थच्या मृत्यूच्या बातमीने टीव्हीपासून बॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंत लोकांना हादरवून सोडले आहे. त्याच्या निधनाने कोट्यवधी चाहत्यांमध्ये दु:खाची लाट पसरली आहे.

ADVERTISEMENT

सिद्धार्थने झोपण्यापूर्वी घेतले होते औषध

मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ शुक्लाने झोपण्यापूर्वी काही औषधे घेतली होती. त्यानंतर तो सकाळी उठलाच नाही. दरम्यान, प्राथमिक अंदाजानुसार, सिद्धार्थ शुक्ला याला हृदयविकाराचा झटका आला असण्याची शक्यता आहे. पण याबाबत अद्याप तरी कोणतीही नेमकी माहिती समोर आलेली नाही. सिद्धार्थचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यानंतरच याबाबतची नेमकी माहिती समोर येऊ शकते.

हे वाचलं का?

काल रात्रीपर्यंत सिद्धार्थ पूर्णपणे तंदुरुस्त होता. अशा परिस्थितीत, सिद्धार्थ शुक्लाचं कोणत्याही गंभीर आजाराशिवाय अचानक निधन होणं हे अत्यंत धक्कादायक आहे.

सिद्धार्थच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर शहनाजने शूटिंग सोडलं अर्धवट

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थच्या मृत्यूची बातमी समजताच त्याची सर्वात जवळची मैत्रिण शहनाज गिल हिने तिचं शूटिंग अर्धवट सोडलं. शहनाज गिल ही सिद्धार्थच्या सर्वात जवळच्यांपैकी एक होती. काही दिवसांपूर्वी दोघेही डान्स दिवाने मध्ये एकत्र रोमान्स करताना दिसले होते.

ADVERTISEMENT

Siddarth Shukla च्या निधनाची बातमी ऐकताच शेहनाझ गिलने अर्ध्यावर सोडलं शुटींग

बिग बॉस 13 चा विजेता होता सिद्धार्थ

सिद्धार्थ शुक्ला हा ‘बिग बॉस’च्या इतिहासातील सर्वात आवडत्या स्पर्धकांपैकी एक होता. या रियालिटी शोमध्ये सिद्धार्थने आपल्या लाखो चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं होतं. सिद्धार्थची आक्रमकता, त्याची खेळाविषयी भावना आणि आत्मविश्वास यामुळे त्याने चाहत्यांना आपलसं केलं होतं. त्यामुळेच तो 13 व्या सीझनचा विजेता ठरला होता.

मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात, बॉलिवूडमध्येही चमकला

12 डिसेंबर 1980 रोजी मुंबईत जन्मलेल्या सिद्धार्थ शुक्लाने एक मॉडेल म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. 2004 मध्ये त्याने छोट्या पडद्यावरुन अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. 2008 मध्ये, तो ‘बाबुल का आंगन छोटे ना’ नावाच्या टीव्ही मालिकेत सर्व प्रथम छोट्या पडद्यावर झळकला होता. पण अभिनेता म्हणून त्याला खरी ओळख ही ‘बालिका वधू’ या मालिकेतूनच मिळाली. ज्यामुळे तो घरोघरी पोहचला.

टीव्ही इंडस्ट्रीमध्ये यश मिळाल्यानंतर सिद्धार्थ शुक्ला देखील बॉलिवूडकडे वळला. तो 2014 मध्ये हंपटी शर्मा की दुल्हनिया चित्रपटात दिसला होता. तर याच वर्षी (2021) त्याची ‘ब्रोकन बट ब्युटिफुल’ नावाची वेब सीरीज देखील आली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT