नांदेड : ‘हल्ला मोहल्ला’ कार्यक्रमात शीख तरुणांचा पोलिसांवर हल्ला, ५ पोलीस गंभीर जखमी
राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे सध्या प्रत्येक शहरांसह जिल्ह्यात धार्मिक कार्यक्रम, मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. नांदेडमधील शीख धर्मीयांचं पवित्र स्थान मानल्या जाणाऱ्या सचखंड हुजूर साहीब गुरुद्वारेत आज हल्ला मोहल्ला कार्यक्रमात काही उत्साही तरुणांनी पोलिसांनी केलेलं बॅरिकेडींग मोडत हिंसाचार केला. या घटनेत जमावाने पोलिसांवर हल्ला चढवला. ज्यात नांदेडचे पोलीस अधिक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांचा अंगरक्षक […]
ADVERTISEMENT
राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे सध्या प्रत्येक शहरांसह जिल्ह्यात धार्मिक कार्यक्रम, मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. नांदेडमधील शीख धर्मीयांचं पवित्र स्थान मानल्या जाणाऱ्या सचखंड हुजूर साहीब गुरुद्वारेत आज हल्ला मोहल्ला कार्यक्रमात काही उत्साही तरुणांनी पोलिसांनी केलेलं बॅरिकेडींग मोडत हिंसाचार केला. या घटनेत जमावाने पोलिसांवर हल्ला चढवला. ज्यात नांदेडचे पोलीस अधिक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांचा अंगरक्षक दिनेश पांडे यांच्यासह पाच पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.
ADVERTISEMENT
पोलिसांनी कोरोनाचं कारण देऊन या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. परंतू गुरद्वारेच्या व्यवस्थापनाने आपण हा कार्यक्रम गुरद्वारेत करु म्हणत आयोजन केलं. परंतू या कार्यक्रमादरम्यान काही शीख तरुणांनी सर्व नियम धाब्यावर बसवून पोलिसांवर हल्ला केला. आपल्या हातात तलवारी नाचवत या तरुणांनी दहशतीचं वातावरण निर्माण केलं. पोलिसांच्या आठ गाड्यांचा या घटनेत चक्काचूर झाला.
हे वाचलं का?
हा प्रकार होत असताना गुरुद्वारेचे प्रमुख या तरुणांना थांबण्याचं आवाहन करत होते, परंतू या तरुणांनी कोणाचंही न ऐकता या परिसरात प्रचंड नासधूस केली. दरम्यान या प्रकरणात कोणाचीही गय न करता सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात येतील अशी माहिती पोलीस अधिक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
पुण्यात अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार, गोळी झाडून ठार करण्याचाही प्रयत्न
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT