जेवण गरम करुन दिलं नाही म्हणून डॉक्टर वहिनीची दिराकडून गोळी झाडून हत्या
देवास (मध्यप्रदेश): एका अतिशय क्षुल्लक कारणावरुन आपल्या वहिनीचीच दिराने गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात घडली आहे. वहिनीची हत्या केल्यानंतर स्वत: दिराने देखील आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पंचनामा करुन दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. हे प्रकरण देवासमधील गोपालपुरा येथील आहे. जिथे […]
ADVERTISEMENT
देवास (मध्यप्रदेश): एका अतिशय क्षुल्लक कारणावरुन आपल्या वहिनीचीच दिराने गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात घडली आहे. वहिनीची हत्या केल्यानंतर स्वत: दिराने देखील आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पंचनामा करुन दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत.
ADVERTISEMENT
हे प्रकरण देवासमधील गोपालपुरा येथील आहे. जिथे संदीप नावाच्या व्यक्तीचा भाऊ विजय याचं त्याच्या वहिनीसोबत जेवण गरम करण्यावरून वाद झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयने आपल्या वहिनीला जेवण गरम करायला सांगितलं होतं. पण तिने त्यासाठी नकार दिला आणि म्हणूनच त्याने तिची गोळ्या झाडून हत्या केली.
नेमकं काय घडलं?
हे वाचलं का?
व्यवसायाने BHMS डॉक्टर असलेल्या संदीपची पत्नी रीना ही आपल्या दिराला जेवण गरम करुन न देता थेट तिच्या क्लिनिकमध्ये निघून गेली.
मिळालेल्या माहितीनुसार, याच गोष्टीचा राग मनात ठेवून काही वेळातच विजय आपल्या वहिनीच्या क्लिनिकमध्ये पोहोचला. आपल्या दिराला थेट क्लिनिकमध्ये आल्याचं पाहून रिनाल देखील आश्चर्य वाटलं. पण काही कळायच्या आताच विजयने आपल्याजवळील बंदूक काढून थेट रिनावर गोळी झाडली.
ADVERTISEMENT
‘मी वहिनीवर गोळी झाडली’, भावाला फोनवरुन दिली महिती
ADVERTISEMENT
गोळी झाडल्यानंतर विजयने सगळ्यात आधी आपल्या भावाला फोन केला आणि आपण वहिनीवर गोळी झाडली असल्याचं सांगितलं. याननंतर विजयने तात्काळ फोन कट केला आणि स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.
गोळीबार झाल्याने क्लिनिक जवळील काही लोकांनी लागलीच तिकडे धाव घेतली. लोक जेव्हा क्लिनिकमध्ये पोहोचले तेव्हा रीना रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तर दुसरीकडे विजय देखील निपचित पडला होता.
चंद्रपूर : बहिणीच्या दिरासोबत जुळले प्रेमसंबंध, आईच्या मदतीने पतीची हत्या करणाऱ्या पत्नीला अटक
यावेळी स्थानिकांनी रीनाला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात नेलं. जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलिसांनी सध्या दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.
या संपूर्ण घटनेनंतर रीनाचा पती संदीप आणि त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. कारण अगदीच क्षुल्लक कारणावरुन एकाच कुटुंबातील दोन जणांचे बळी गेले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT