भयंकर! 12 वर्षाच्या मुलीसह महिलेचा मृतदेह सापडला रक्ताच्या थारोळ्यात; पती फरार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

12 वर्षाच्या मुलीसह पत्नीची निर्घृणपणे हत्या करत आरोपीनं पहाटे घरातून पोबारा केल्याच्या घटनेनं करमाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे. लक्ष्मी अण्णा माने (वय 30) आणि श्रुती माने (वय 12) अशी मृतांची नावे आहेत. आरोपी मोटारसायकलवरून घरातून निघून गेल्यानंतर मुलाने खोलीत जाऊन बघितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.

ADVERTISEMENT

राज्यात गुन्हेगारीच्या विविध घटना चर्चेत असतानाच आता सोलापूर जिल्ह्यात भयंकर घटना घडली आहे. पतीने पत्नी व मुलीचा डोक्यात प्रहार करून खून केला. करमाळा तालुक्यातील भिलारवाडी येथे ही घटना घडली आहे. मयत आई व मुलगी आहेत. तर अण्णा भास्कर माने (रा. भिलारवाडी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर) असे संशयित आरोपींचं नाव आहे.

लग्न का करुन देत नाही म्हणून मुलाने केली वडिलांची हत्या

हे वाचलं का?

कमलेश गोपाळ चोपडे (वय 30, रा. देवळाली, जि. सोलापूर) याने या प्रकरणी करमाळा पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (8 नोव्हेंबर) सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास भिलारवाडी येथील मृताच्या राहत्‍या घरात ही घटना घडली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, संशयित आरोपी अण्णा माने, मयत लक्ष्मी माने व श्रृती माने, मुलगा रोहित माने व अण्णा माने याची आई हे एकत्रित भिलारवाडी येथे राहतात. दोन्ही मृत व संशयित आरोपी अण्णा हे एका खोलीत, तर मुलगा रोहित हा आजी सोबत दुसऱ्या खोलीत झोपलेले होते.

ADVERTISEMENT

जस्ट डायलचा वापर वेश्या व्यवसायासाठी ? स्पा, मसाजच्या चौकशीनंतर समोर आलं 150 मुलींचं ‘रेटकार्ड’

ADVERTISEMENT

दरम्यानस, पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास संशयित आण्णा माने हा मोटारसायकलवरून निघून गेल्याचे मुलगा रोहित माने याने पाहिले. त्यानंतर लक्ष्मी व श्रृती या दोघींचे सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह आढळून आल्याने हा खुनाचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात अण्णा माने यानेच अज्ञात हत्याराने अज्ञात कारणाने दोघींच्या डोक्यात मारून गंभीर जखमी करून जीवे ठार मारल्‍याचा संशय आहे.

वहिनीकडे काम करू नकोस सांगणाऱ्या दिराची कामगाराने तलवारीचे वार करत केली हत्या

मयत लक्ष्मी यांचा भाऊ कमलेश चोपडे यांनी संशयित आरोपी अण्णा मानेच्या विरोधात दोघींचा खून केल्याची फिर्याद दिली आहे. याबाबत करमाळा पोलिसांनी संशयित आरोपी अण्णा माने याच्या तपासासाठी तीन पथकं पाठवली आहेत. अद्याप आण्णा माने हा फरार झाला असून, त्‍याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर हे करीत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT