Maratha Reservation : आक्रोश मोर्चा रोखण्यासाठी सोलापुरात पोलिसांची विविध भागांत नाकाबंदी
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सोलापुरात होणाऱ्या आक्रोश मोर्चासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सकाळी ११ वाजता सोलापुरात मराठा समाजाचे कार्यकर्ते जमणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या मोर्चाला परवनागी नाकारण्यात आलेली असली तरीही आंदोलनकर्त्यांनी मोर्चा काढणार असल्याचं ठामपणे सांगितलं. दरम्यान आंदोलनकर्त्यांना सोलापुरात येण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी फौजफाटा तैनात केला असून पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, माढा, सांगोला या भागांमधून येणाऱ्या […]
ADVERTISEMENT
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सोलापुरात होणाऱ्या आक्रोश मोर्चासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सकाळी ११ वाजता सोलापुरात मराठा समाजाचे कार्यकर्ते जमणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या मोर्चाला परवनागी नाकारण्यात आलेली असली तरीही आंदोलनकर्त्यांनी मोर्चा काढणार असल्याचं ठामपणे सांगितलं.
ADVERTISEMENT
दरम्यान आंदोलनकर्त्यांना सोलापुरात येण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी फौजफाटा तैनात केला असून पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, माढा, सांगोला या भागांमधून येणाऱ्या वाहनांची कसून चौकशी करायला सुरुवात केली आहे. मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते कालच सोलापुरात दाखल झाले असून गनिमी काव्याच्या पद्धतीने आजचा मोर्चा यशस्वी करण्याचा विश्वास नरेंद्र पाटील यांनी बोलून दाखवला आहे.
हे वाचलं का?
असा आहे आजच्या आक्रोश मोर्चासाठी पोलिसांचा बंदोबस्त –
सोलापुरात ८२ ठिकाणी नाकेबंदी
ADVERTISEMENT
१८०० पोलीस कर्मचारी
ADVERTISEMENT
२०० पोलीस अधिकारी तैनात
दरम्यान मराठा कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून दडपशाही होत असल्याचं सांगत नरेंद्र पाटील यांनी पुढचा मोर्चा हा न सांगता काढू असा इशारा दिला आहे. “राज्यात इतर ठिकाणी आंदोलनं झाली, सोलापुरातही आंदोलनं-मोर्चे निघाले. त्यावेळी त्यांना परवानगी मिळाली पण मराठा समाजाच्या मोर्चाला जाणुनबुजून परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे पुढचा मोर्चा हा न सांगता काढू”, असा इशारा अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.
Maratha Reservation: ‘या ठिणगीचा राज्यभर वणवा पसरणार’, भाजप खासदाराचा सरकारला इशारा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT