Neurological Disorder: कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर काही जणांमध्ये आढळला ‘हा’ दुर्मिळ आजार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: कोरोना प्रतिबंधक लसीनंतर (Vaccine) त्याचे काही साइड इफेक्ट ही एक सामान्य बाब मानली जात आहे. पण, अ‍ॅस्ट्रॅजेनेका-ऑक्सफोर्डच्या (astrazeneca) कोरोना प्रतिबंधक लसीमुळे मज्जासंस्थेशी निगडित (Neurological Disorder) एक दुर्मिळ आजार काही लोकांमध्ये दिसून आला आहे. एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार नर्वस सिस्टमशी (मज्जासंस्थेशी) संबंधित या आजाराचे नाव गुलियन-बेरी सिंड्रोम असं आहे.

ADVERTISEMENT

दोन वेगवेगळ्या अभ्यासानुसार आतापर्यंत एकूण 11 लोकांमध्ये हा आजार आढळून आला आहे. यापैकी 7 रुग्ण हे भारतातील आहेत तर चार रुग्ण हे UK मधील नॉटिंग्हमचे आहेत. या सर्वांनी या रोगाचे निदान होण्याच्या 10-20 दिवस आधी

अ‍ॅस्ट्रॅजेनेका लस घेतली होती. भारतात ही लस कोव्हिशील्डच्या (Covishield) नावाने लोकांना दिली जात आहे.

हे वाचलं का?

गुलियन-बेरी सिंड्रोम (GBS) मध्ये, शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा चुकून नर्वस सिस्टमच्या काही भागांवर आक्रमण करते. या नसा मेंदूत आणि पाठीच्या कण्याच्या बाहेर असतात.

एनल्स ऑफ न्यूरोलॉजी या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या दोन्ही अभ्यासामध्ये गुलियन-बेरी सिंड्रोमबाबत प्रामुख्याने सांगण्यात आले आहे. स्टडीनुसार हा एक दुर्मिळ प्रकारचा आजार आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने चेहऱ्याच्या नसा कमकुवत होतात.

ADVERTISEMENT

Covid vaccine death: एका 68 वर्षीय व्यक्तीचा लस घेतल्यानंतर मृत्यू, सरकारने केलं मान्य

ADVERTISEMENT

संशोधकांना असे आढळले आहे की, लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यांत बहुतेक लोकांना हा आजार झाला आहे. भारतातील सर्व 7 जणांमध्ये गुलियन-बेरी सिंड्रोमचे तीव्र लक्षणं आढळून आली आहेत.

अभ्यासानुसार, या आजारामुळे या लोकांच्या चेहऱ्याच्या दोन्ही बाजू कमकुवत झाल्या असून काहिशा लटकलेल्या दिसू लागल्या आहेत. हे सहसा गुलियन-बेरी सिंड्रोमच्या 20 टक्क्यांपेक्षा कमी रुग्णांमध्ये घडत असतं. या अभ्यासामध्ये लसीकरण आणि या रोगाशी संबंधित एक प्रकारच्या पॅटर्नबद्दल सांगितलं आहे.

नॉटिंग्हम युनिव्हर्सिटी हॉस्पिटलशी निगडित अभ्यासाच्या एका लेखकाने म्हटले आहे की, ‘SARS-CoV-2 लस खूपच सुरक्षित आहे. परंतु तरीही आम्हाला चार असे रुग्ण सापडले आहेत की ज्यांना ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका लस दिल्यानंतर तीन आठवड्यातच गुलियन-बेरी सिंड्रोम रोगाची गंभीर लक्षणं आढळून आली आहेत.

कोरोना लस घेताना आणि घेतल्यानंतर काय काळजी घ्याल? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

संशोधनकर्त्यांना असं म्हटलं आहे की, ‘आम्ही SARS-CoV-2 साठी लस घेतल्यानंतर गुलियन-बेरी सिंड्रोमपासून चेहऱ्यावरील स्नायू कमकुवत झाल्यास खबरदारी घेण्याची शिफारस करतो.’ या अभ्यासातील निष्कर्षानंतर लस घेतल्यानंतर अशा रुग्णांवर आता लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे.

काही दिवसांपूर्वी इंडियन कॉउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) केलेल्या अभ्यासातही कोरोनान संक्रमित मुंबईतील गर्भवती महिलेमध्ये गुलियन-बेरी सिंड्रोम हा दुर्मिळ आजार आढळून आला होता. अभ्यासानुसार, प्रेग्नसींच्या पाचव्या महिन्यात या महिलेचा अचानक गर्भपात झाला. कोव्हिड-19 संसर्ग झालेल्या या गर्भवती महिलेमध्ये या सिंड्रोमची ही पहिली घटना आहे. धक्कादायक म्हणजे महिलेच्या बाळाचा पोटातच अचानक मृत्यू झाला.

Fact Check: कोरोना Vaccine घेतल्यानंतर 2 वर्षाच्या आत मृत्यू? जाणून घ्या ‘या’ व्हायरल स्टोरी मागचं नेमकं सत्य

गुलियन-बेरी सिंड्रोम हा मज्जासंस्थेशी (नर्वस सिस्टम) संबंधित एक रोग आहे. सुरुवातीला यामुळे शरीरात कमकुवतापणा जाणवतो. चेहऱ्यावरील स्नायू कमकुवत होतात आणि हात आणि पायमध्ये मुंग्या येणं जाणवतं. काही लोकांमध्ये यामुळे हृदयाचा ठोके अनियमित पडू लागतात. यामुळे अर्धांगवायूचा झटका देखील येऊ शकतो.

तथापि, कोरोना लसीच्या जेव्हा चाचण्या झाल्या होत्या तेव्हा ही लस सुरक्षित तसेच प्रभावी असल्याचे सिद्ध झाले होते. भारतातील कोट्यवधी लोकांना कोविडशील्ड लस मिळाली आहे.

परंतु आत्तापर्यंत अशाप्रकारच्या रोगाची लक्षणं ही फक्त सात जणांमध्ये आढळून आले आहेत. त्यामुळे लस घेण्यास अजिबात घाबरू नका आणि कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीचे दोन्ही डोस जरुर घ्या.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT