परीक्षा विद्यार्थ्यांची नव्हे तर अधिकाऱ्यांची…; बोर्डाच्या परीक्षांवर सोनू सूदचं ट्विट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाच्या काळात अभिनेता सोनू सूदने अनेक गरजूंना मदतीचा हात पुढे केला होता. सोनू फक्त लोकांची मदतच करत नाही तर संवेदनशील मुद्द्यांवर त्याची मतं देखील मांडतो. तर सोनूने आता विद्यार्थ्यांसाठी आवाज उठवला आहे. आज सोनूने पुन्हा एकदा ट्विट करत परीक्षा ही ऑथोरिटीससाठी असल्याचं म्हटलंय.

ADVERTISEMENT

बोर्डाच्या परीक्षा रद्द करा; विद्यार्थ्यांच्या मागणीला सोनू सूदला पाठिंबा

आज सोनू त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला, “ही परीक्षा विद्यार्थ्यांची नसून अधिकाऱ्यांची आहे. जर त्यांनी परीक्षा रद्द केली तर ते उत्तीर्ण आणि जर परीक्षा रद्द नाही केली तर मात्र अनुत्तीर्ण” याचसोबत सोनूने #cancelboardexams2021 हा हॅशटॅग देखील दिला आहे.

हे वाचलं का?

काल सोनूने यासंदर्भात व्हिडीयो शेअर केला होता. तो व्हिडीयोमध्ये म्हणतो, “सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन परीक्षांना दुसरा पर्याय पाहिला पाहिजे. सौदी अरेबियामध्ये 600 विद्यार्थी असताना परीक्षा रद्द झाली. मेक्सिकोमध्ये 1300 तर कुवेतमध्ये 1500 रुग्ण असूनही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतात 1 लाखांपेक्षा जास्त रुग्ण समोर येतायत. त्यामुळे सरकारने विद्यार्थ्यांची समस्या समजून त्यावर विचार करावा.”

सोनूनंतर अभिनेत्री रवीना टंडनने देखील विद्यार्थ्यांची परीक्षेसंदर्भात मत व्यक्त केलंय. ती म्हणते, “सर्व विद्यार्थ्यांसाठी बोर्डाच्या परीक्षेसाठीचा काळ खूपच तणावपूर्ण आहे. जेव्हा सर्व मोठ्या व्यक्ती लॉकडाऊन म्हणून घरी आहेत अशा परिस्थितीत विद्यार्थी परिक्षेसाठी बाहेर जाणार. तर ज्यांच्या घरी वृद्ध व्यक्ती आहेत किंवा पालकांना आरोग्याविषयक समस्या आहेत, अशा मुलांना देखील बाहेर जाणं धोक्याचं आहे.”

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT