Pune : अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातली दोन कोटींची साऊंड सिस्टीम चोरीला? NCP नगरसेवकाने समोर आणली बाब

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे महापालिकेच्या  बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील 2 कोटी रुपये किंमतीचे साऊंड चोरीला गेले असल्याची धक्कादायक बाब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सुभाष जगताप यांनी सर्व साधारण सभेत समोर आणली आहे.

ADVERTISEMENT

सुभाष जगताप यांनी ही बाब समोर आणल्यानंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला. बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात 2 कोटी रुपयांची अत्याधुनिक साऊंड सिस्टीम (बॉस कंपनीचे) बसवण्यात आली होती. कोरोना काळात दीड वर्षांपासून कोरोनामुळे नाट्यगृह बंद ठेवण्यात आली होती. या कालावधीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील बॉस कंपनीचे सुमारे 2 कोटी रुपयांचे साऊंड चोरीला गेले आहेत असा आरोप राष्ट्रवादी नगरसेवक सुभाष जगताप यांनी केला आहे.

सुभाष जगताप यांनी साधारण सभेत बोलत असताना, त्या ठिकाणी डुप्लिकेट साऊंड सिस्टीम बसवण्यात आल्याचाही आरोप केला. प्रशासनाने याप्रकरणी काय कारवाई केली? याप्रकरणी प्रशासनाने तातडीने गुन्हा दाखल  केला नाही असा गौप्यस्फोट  राष्ट्रवादी नगरसेवक सुभाष जगताप यांनी केलाय, या प्रकरणी वास्तव काय आहे हे आयुक्तांच्या माध्यमातून चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल असं उत्तर सत्ताधारी देताहेत नेमका हा सगळा प्रकार कोणाच्या संगनमताने होतोय हे पाहणं महत्वाचं आहे.

हे वाचलं का?

दरम्यान महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT