काळ-वेळ, परिस्थिती पाहून बोलत चला – डॉ. हर्ष वर्धन यांचा बाबा रामदेवांना सल्ला
Allopathy उपचारांना दूषण देऊन त्या पद्धतीला तमाशा, बेकार, दिवाळखोर असं म्हणणाऱ्या बाबा रामदेव यांना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही खडे बोल सुनावले आहेत. बाबा रामदेव यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी होत होती. IMA (Indian Medical Association) ने रामदेव यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. Allopathy बाबतचं वक्तव्य बाबा रामदेव यांना भोवलं, IMA […]
ADVERTISEMENT
Allopathy उपचारांना दूषण देऊन त्या पद्धतीला तमाशा, बेकार, दिवाळखोर असं म्हणणाऱ्या बाबा रामदेव यांना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही खडे बोल सुनावले आहेत. बाबा रामदेव यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी होत होती. IMA (Indian Medical Association) ने रामदेव यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
ADVERTISEMENT
Allopathy बाबतचं वक्तव्य बाबा रामदेव यांना भोवलं, IMA ने पाठवली कायदेशीर नोटीस
डॉ. हर्ष वर्धन यांनी बाबा रामदेव यांना पत्र लिहून कोणत्याही मुद्द्यावर काळ-वेळ, आजुबाजूची परिस्थिती काय आहे हे पाहून बोलत चला असा सल्ला दिला आहे. “Allopathy उपचारांबद्दल तुम्ही केलेलं वक्तव्य हे दुर्दैवी असून मी त्याबद्दल माझ्या भावना फोनवरुन तुम्हाला सांगितल्या आहेत. तुमच्या वक्तव्यामुळे डॉक्टरांपासून देशवासियांच्या भावना दुखावल्या आहेत. तुम्ही यावर दिलेलं स्पष्टीकरणही पुरेसं नाहीये. कोरोना काळात Allopathy उपचारपद्धतीने कोट्यवधी लोकांना जीवनदान दिलं आहे. अशावेळी लाखो कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू Allopathy औषधांमुळे झाला असं आपलं म्हणणं दुर्भाग्यपूर्ण आहे.”
हे वाचलं का?
कोरोनाविरुद्धच्या लढाईत सर्व डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी आपली जीव धोक्यात घालून सेवा करत आहे. अशावेळी Allopathy उपचारांना तमाशा, बेकार, दिवाळखोर म्हणणं योग्य नाही. आजही अनेक लोकं बरी घेऊन घरी जातायत, संकटकाळातही देशाचा मृत्यूदर आटोक्यात आहे…यामध्ये Allopathy डॉक्टरांचंही महत्वपूर्ण योगदान आहे. तुम्ही असे व्यक्ती आहात की तुमच्या कोणत्याही विधानाला महत्व दिलं जातं. त्यामुळे कोणत्याही मुद्द्यावर बोलताना काळ-वेळ, परिस्थिती पाहून बोलत चला अशा शब्दांत हर्ष वर्धन यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या आहेत.
आतापर्यंत पोलियो, इबोला, टी.बी. यासारख्या अनेक गंभीर आजारांवर Allopathy ने निदान झालेलं आहे. कोरोनाविरुद्ध लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळतोय हे देखील एका अर्थाने Allopathy चं यश आहे. त्यामुळे जगभरातील कोविड योद्धे आणि डॉक्टरांच्या भावनांचा सन्मान करुन तुम्ही तुमचं वक्तव्य मागे घ्याल अशी आशा हर्ष वर्धन यांनी आपल्या पत्रात केली आहे.
ADVERTISEMENT
पतंजली योगपीठाने काय म्हटलं आहे?
ADVERTISEMENT
पतंजलीने IMA ने केलेले आरोप फेटाळले आहेत. योगगुरू रामदेवबाबाब यांनी Allopathyच्या विरोधात केलं असल्याचा IMA चा आरोप पतंजलीने फेटाळला आहे. तसंच लोकांची दिशाभूल करणं आणि Allopathy बदनाम करणं हे आरोपही पतंजलीने फेटाळले आहेत. एवढंच नाही तर पतंजलीने हेदेखील म्हटलं आहे की योगगुरू रामदेवबाब हे सगळ्या डॉक्टरांचा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान आणि आदर राखतात. कोरोना महामारीमध्ये हे सगळेजण दिवसरात्र काम करत आहेत याबद्दलही बाबा रामदेव यांना आदरच वाटतो आहे. आधुनिक चिकित्सा पद्धतीने इलाज करणाऱ्यांसाठी त्यांच्या मनात कोणताही चुकीचा हेतू नाही. जे आरोप बाबा रामदेव यांच्या विरोधात केले जात आहेत ते निरर्थक आहेत असंही पतंजलीने म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT