एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी स्टॅन स्वामी यांचं निधन
ख्रिस्ती धर्मगुरु आणि आदिवासी हक्कांचे कार्यकर्ते म्हणून परिचीत असलेल्या फादर स्टॅन स्वामी यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी स्वामी यांनी मुंबईतील होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. काही वर्षांपूर्वी राज्यात गाजलेल्या एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगाव प्रकरणात स्वामी यांना अटक करण्यात आली होती. रविवारी स्वामी यांची तब्येत अचानक खालावल्यामुळे त्यांच्या वकीलांनी मुंबई हायकोर्टात तब्येतीचं […]
ADVERTISEMENT
ख्रिस्ती धर्मगुरु आणि आदिवासी हक्कांचे कार्यकर्ते म्हणून परिचीत असलेल्या फादर स्टॅन स्वामी यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी स्वामी यांनी मुंबईतील होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. काही वर्षांपूर्वी राज्यात गाजलेल्या एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगाव प्रकरणात स्वामी यांना अटक करण्यात आली होती. रविवारी स्वामी यांची तब्येत अचानक खालावल्यामुळे त्यांच्या वकीलांनी मुंबई हायकोर्टात तब्येतीचं कारण देऊन जामिनासाठी अर्ज केला होता.
ADVERTISEMENT
रविवारी सकाळी साडे चार वाजल्याच्या दरम्यान स्वामी यांची तब्येत cardiac arrest मुळे खालावली. यानंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा झालीच नाही. सोमवारी दुपारी १ वाजून २४ मिनीटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वामी यांच्यावर पार्किन्सन आणि इतर आजारांसाठी उपचार होत होते.
स्वामी यांच्या निधनाची माहिती मुंबई हायकोर्टाला देण्यात आली आहे. त्यांच्या निधनानंतर हायकोर्टानेही खेद व्यक्त केला आहे. मे महिन्यापासून स्वामी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. रविवारी त्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागल्यानंतर त्यांना व्हेंटीलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं. मात्र यानंतर त्यांची तब्येत खालावतच गेली. गेल्या वर्षी ८ ऑक्टोबरला रांची येथून स्वामी यांना अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्यांना तळोजा जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT