स्टारकिड तरीही जॉनी लिवरची मुलगी जेमी लिवरला करावा लागला स्ट्रगल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

बॉलिवडूमधील नेपोटिझम म्हणजे घराणेशाही वादाचा विषय ठरलेला आहे. स्टारकिड्स आणि बाहेरून येणारे कलाकार यावरून चर्चा होते.

हे वाचलं का?

असं असलं तरी स्टारकिड असूनही अनेकांना बॉलिवूडमध्ये संधी मिळत नाही. ते स्ट्रगल करताना दिसतात.

ADVERTISEMENT

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते जॉनी लिवर यांची मुलगीही यापैकी एक आहे. जॉनी लिवर यांनी अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीये.

ADVERTISEMENT

जॉनी लिवर यांच्याप्रमाणेच त्यांची मुलगी जेमी लिवर स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतेय.

जेमी लिवरने २०१५ मध्ये कॉमेडियन कपिल शर्मा याच्या ‘किस-किस को प्यार करूं’ आणि ‘हाऊसफुल-४’ मध्ये भूमिका केल्या आहेत.

जेमी लिवरने आतापर्यंत फक्त दोनच चित्रपट केले आहेत, पण कॉमेडीमध्ये तिने वडिलांप्रमाणेच स्वतःला सिद्ध केलं आहे.

जेमी लिवर चांगली मिमिक्री करते आणि त्या बळावर तिने काही प्रमाणात यशही मिळवलं आहे.

सोशल मीडियावर तिचे व्हिडीओ व्हायरल होत असतात.

कॉमेडीच्या क्षेत्रात जेमी लिवरने स्वतःची जागा निर्माण केली असली, तरी तिला यासाठी बराच स्ट्रगल करावा लागला.

स्टारकिड असूनही जेमी लिवरने कुणाचीही मदत घेतली नाही. तिने स्वतःला सिद्ध करत इथपर्यंतची मजल मारलीये.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT