पुणे : महाराष्ट्राला लसीची कमतरता भासणार नाही – प्रकाश जावडेकरांचं आश्वासन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लसीकरणावरुन गेल्या काही दिवसांपासून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये चांगलंच वाकयुद्ध रंगलं होतं. विकेंड लॉकडाउन केल्यानंतरही परिस्थिती अजून नियंत्रणात येत नाहीये. पुण्यात आज परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. ज्यात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्राला लसींची कमतरता भासणार नाही असं आश्वासन दिलं आहे.

ADVERTISEMENT

आजपासून राज्यात विकेंड लॉकडाउनची घोषणा करण्यात आली ज्यात पुण्यात नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना जावडेकर यांनी या प्रतिसादाबद्दल त्यांचे आभार मानले. “पुढच्या ३ दिवसांमध्ये राज्याला १ हजार १२१ व्हेंटिलेटर मिळणार आहे. ऑक्सिजनचा पुरवठाही होईल. केंद्र सरकार राज्याला सर्वतोपरीने मदत करणार आहे. टेस्टिंग-ट्रॅकिंग या कामासाठी मनुष्यबळ लागल्यास त्याचे पैसेही केंद्र सरकार देईल. काल संध्याकाळपर्यंत राज्यात १ कोटी १० लाख एवढे लसींचे डोस आले असून राज्याला लसींची कमतरता भासणार नाही”, असं आश्वासन जावडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

सध्या केंद्राचं एक पथक महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेत आहे. सध्याची वेळ ही आरोप-प्रत्यारोप करण्याची नाही, परिस्थिती गंभीर आहे आणि जनतेच्या हितापेक्षा सध्या जास्त काहीच महत्वाचं नसल्याचं जावडेकर यांनी स्पष्ट केलं. अजित पवारांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधत असताना सध्याची वेळ राजकारण करण्याची नसल्याचं म्हणत परिस्थितीवर नियंत्रण मिळवणं गरजेचं असल्याचं स्पष्ट केलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT