राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकरांकडून वाईन विक्रीच्या निर्णयाचं समर्थन
मनीष जोग, जळगाव: ‘राज्य सरकारने महसूल वाढीच्या दृष्टीने वाईन विक्रीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो मला योग्य वाटतो.’ असं मत राज्य महिला आयोग अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केलं आहे. त्या जळगावमधील पत्रकार परिषदेत बोलत होत्या. पाहा रुपाली चाकणकर नेमकं काय म्हणाल्या: ‘वाईन विक्रीबाबत महिला आयोगाकडे एकही तक्रार आलेली नाही. राज्य […]
ADVERTISEMENT
मनीष जोग, जळगाव: ‘राज्य सरकारने महसूल वाढीच्या दृष्टीने वाईन विक्रीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो मला योग्य वाटतो.’ असं मत राज्य महिला आयोग अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केलं आहे. त्या जळगावमधील पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
ADVERTISEMENT
पाहा रुपाली चाकणकर नेमकं काय म्हणाल्या:
‘वाईन विक्रीबाबत महिला आयोगाकडे एकही तक्रार आलेली नाही. राज्य सरकारने महसूल वाढीच्या दृष्टीने वाईन विक्रीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो मला योग्य वाटतो. जर याबाबत महिलांचे काही आक्षेप असतील किंवा तक्रारी आल्या तर आम्ही त्याबाबत सरकारला जरुर कळवू.’ अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी यावेळी दिली आहे.
हे वाचलं का?
एकीकडे वाईन विक्रीच्या निर्णयावरुन विरोधी पक्षाने सातत्याने महाविकास आघाडीवर टीकेची झोड उठवली आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी तर महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनविण्याचा प्रयत्न असल्याची टीका केलेली आहे. तर आता दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी मात्र, सरकारच्या या निर्णयाचं समर्थन केलं आहे. त्यामुळे आता विरोधक नेमकी काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
राज्यातल्या सुपरमार्केटमध्ये मिळणार वाईन
ADVERTISEMENT
राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईनची विक्री केली जाणार आहे. 27 जानेवारी 2022 रोजी राज्य मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला होता. एक हजार स्केअर फुटाच्या सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करता येऊ शकेल. सुपर मार्केट, वॉकिंग स्टोअरमध्ये वाईनच्या विक्रीला परवानगी देण्याबाबत प्रस्ताव आला होता. या प्रस्तावाला मान्यता देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
सध्या राज्यात वाईनची दरवर्षी 70 लाख लिटरच्या घरात विक्री होते. सरकारच्या या नव्या धोरणामुळं हा आकडा आता 1 हजार कोटी लिटरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. मात्र, त्या आधी राज्य सरकारनं वाईनवर प्रति लिटरमागे 10 रुपयांचा अबकारी कर जाहीर केला आहे. त्यामुळे वाईनच्या दरांमध्ये वाढ होणार आहे.
याव्यतिरिक्त किराणा दुकानात होणाऱ्या वाईनची विक्री ही बीअरच्या धर्तीवर कॅनमधून करण्याची मागणी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार नवीन वाईन पॉलिसी राबवण्याच्या तयारीत होतं. त्या दृष्टीकोनातून आता हे पाऊल टाकण्यात आलं आहे.
याबद्दल बोलताना राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक म्हणाले होते, ‘महाराष्ट्रात बऱ्याच वाईनरी असताना आता 1000 चौरस फुटांच्या छोट्या दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या फळ उत्पादनावर वाईनरी चालते. त्यांना चालना देण्यासाठी वाईन विक्री करता येणार आहे.’
उत्पादन शुल्कानं या आधीच आयात व्हिस्कीवरील शुल्क 300 टक्क्यांवरून 150 टक्क्यांवर आणले आहे. आता सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT