रघुनाथ कुचिक प्रकरणाची महिला आयोगाने घेतली दखल, पुणे पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश
पुण्यातील शिवसेना उप-नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर एका तरुणीने लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार आणि जबरदस्तीने गर्भपात करायला लावल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात कुचिक यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला असला तरीही त्यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची चिन्ह दिसत आहेत. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेत पुणे पोलिसांना चौकशीचा अहवाल सादर करायचे आदेश दिले आहेत. शिवसेना […]
ADVERTISEMENT
पुण्यातील शिवसेना उप-नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर एका तरुणीने लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार आणि जबरदस्तीने गर्भपात करायला लावल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात कुचिक यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला असला तरीही त्यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची चिन्ह दिसत आहेत. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेत पुणे पोलिसांना चौकशीचा अहवाल सादर करायचे आदेश दिले आहेत.
ADVERTISEMENT
शिवसेना उप-नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर एका तरुणीने बलात्कार करुन गर्भपात करायला लावल्याचा आरोप केला होता. इतकच नव्हे तर याबाबत वाच्यता केलीस तर जीवे मारण्याची धमकीही कुचिक यांनी दिल्याचं पीडित तरुणीने सांगितलं. या प्रकरणात पुणे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर कुचिक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. परंतू तोपर्यंत कुचिक यांनी न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीन मिळवला होता.
मध्यंतरी या पीडित तरुणीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन आत्महत्या करत असल्याचं सांगितलं होतं. परंतू पुणे पोलिसांनी या प्रकरणात वेळेतच हस्तक्षेप करत या तरुणीला असं कोणतंही पाऊल उचलण्यापासून रोखलं आहे. यानंतर पीडित तरुणीने कुचिक आणि त्यांच्या माणसांकडून आपल्याला त्रास देणारे मेसेज व त्याचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर शेअर केले होते.
हे वाचलं का?
रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्कार आणि गर्भपाताचा आरोप करणाऱ्या तरुणीचा तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोगास काल प्राप्त झाला असून वरिष्ठ पोलीस निरिक्षक शिवाजी नगर पोलीस स्टेशन यांना याबाबत योग्य ती कार्यवाही करून याचा अहवाल राज्य महिला आयोगास सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. pic.twitter.com/NIo3bnlU6x
— Maharashtra State Commission for Women (@Maha_MahilaAyog) March 21, 2022
या प्रकरणात भाजपने महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेला चांगलंच घेरलं होतं. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुणे पोलिसांवर आरोप करत पोलीस रघुनाथ कुचिक यांना मदत करत असल्याचं म्हटलं होतं. यानंतर पीडित तरुणीने माध्यमांसमोर येत मुलाखती दिल्यानंतर राज्य महिला आयोगाने तिच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT