धर्मसंसदेत केलेली वक्तव्य म्हणजे हिंदुत्व नव्हे – सरसंघचालक मोहन भागवत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशात गेल्या काही महिन्यांपासून धर्मसंसदेत महात्मा गांधीवरुन करण्यात आलेल्या वक्तव्यामुळे मोठा गदारोळ माजला होता. गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजवर देशभरात गुन्हेही दाखल झाले. यानंतर पुन्हा एकदा हिंदुत्वावर टीका आणि चर्चांना उधाण आलं होतं. परंतू या सर्व घटनांवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी महत्वाचं विधान केलं आहे.

ADVERTISEMENT

धर्मसंसदेत केलेली वक्तव्य म्हणजे हिंदुत्व नव्हे आणि जे हिंदू धर्माला मानतात त्यांनी त्याकडे अजिबात लक्ष देऊ नये, असं मोहन भागवत म्हणाले.

लोकमत मीडिया ग्रुपने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मोहन भागवत ‘Hindutva and National Integration’ या विषयावर बोलत होते. “धर्मसंसदेत केलेली वक्तव्य म्हणजे हिंदुत्व नव्हे. समजा मी कधीतरी रागाच्या भरात एकाचं विधान केलं, तर ते हिंदुत्व होत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा जे लोकं हिंदू धर्माला मानतात ते यावर विश्वास ठेवत नाहीत.”

हे वाचलं का?

छत्तीसगडमध्ये धर्मसंसदेत कालीचरण महाराजांनी महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह विधान करताना गोडसेची केलेली भलामण आणि त्यानंतर देशात सुरु झालेला वाद या पार्श्वभूमीवर सरसंघचालकांनी केलेलं हे विधान महत्वपूर्ण ठरलं आहे.

२०२१ डिसेंबरमध्ये उत्तराखंड, हरिद्वार येथे अशाच एका धर्मसंसदेचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यात मुस्लीम समुदायाबद्दल मनात द्वेष निर्माण करणारं आणि चिथावणी देणारं विधान करण्यात आलं होतं, ज्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हाही दाखल केला होता. यावेळी बोलत असताना मोहन भागवत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं उदाहरण देलं.

ADVERTISEMENT

वीर सावरकरांनी म्हटलं आहे की, “जर हिंदू समुदाय एकत्र आला आणि संघटीत झाला तरीही ते भगवद गीतेवर चर्चा करतील ते कोणालाही इजा पोहचेल किंवा दुसऱ्यांना त्रास होईल असा विचार करणार नाहीत.” भारत देश हिंदुराष्ट्र होण्याकडे वाटचाल करतोय का या प्रश्नावर बोलत असताना भागवत म्हणाले, हिंदुराष्ट्र होण्याचा प्रश्नच येत नाही. तुम्ही माना किंवा मानू नका भारत हे हिंदुराष्ट्रच आहे.

ADVERTISEMENT

भारतीय संविधानाचा गाभाही एका प्रकारे हिंदुत्वच आहे, राष्ट्रीय एकात्मता यालाच म्हणतात. राष्ट्रीय एकात्मतेच्या संकल्पनेसाठी एकसमानतेची आवश्यकता नाही. कारण आपण वेगळे असलो याचा अर्थ आपण एकमेकांपासून दुरावले आहोत असा होत नाही. संघ लोकांना तोडायचं काम करत नाही, संघ लोकांना जोडतो. आम्ही या हिंदुत्वाला मानतो असंही सरसंघचालक या कार्यक्रमात म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT