लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर तरीही मुंबईकरांना कोरोनाची भीती वाटत नाही?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई कधीही थांबत नाही.. कारण मुंबईकर हा दिवसरात्र कामानिमित्त धावतच असतो. पण गेल्या वर्षी याचवेळी म्हणजे मार्च 2020 पासून कोरोना नावाचा आजाराने मुंबईसह देशात शिरकाव केला होता. सुरुवातीला मुंबईकरांना फारसं याचं गांभीर्य वाटत नव्हतं. पण जसजसं या आजाराचं गांभीर्य समजतं गेलं तसतसं मुंबईकर देखील धास्तावले होते. त्यातच लॉकडाऊनची वेळही मुंबईसह संपूर्ण देशावर ओढावली होती.

ADVERTISEMENT

सुरुवातीच्या काळात मुंबईकरांनी लॉकडाऊनचं अगदी काटेकोरपणे पालन केलं. पण जसजसे दिवस पुढे सरकू लागले तसतसं मुंबईकरांचा धीर सुटू लागला. आजवर कधीही न थांबलेली मुंबई आपण पाहत आलो होतो. पण कोरोनासारख्या साथीच्या आजाराने मुंबईच काय अवघं जग थांबलं होतं.

आजवर मुंबईने अनेक संकटं झेलली आहेत. मग ती आस्मानी असो की सुल्तानी प्रत्येक संकटात मुंबईकराने त्याच धीराने तोंड दिलं आहे. त्यामुळे अगदी बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ला की महापूर असो कोणत्याही संकटात मुंबईकरांनी कधीही हार न मानता आपल धैर्य कायम ठेवलं. पण कोरोना आणि लॉकडाऊनने पहिल्यांदाच मुंबईकरांच्या धैर्याची परीक्षा पाहिली किंवा अजूनही पाहतोय. सुरुवातीला काहीसे धास्तावलेले मुंबईकर आता मात्र फारच निर्धास्त झाल्याचं पाहायला मिळतंय.

हे वाचलं का?

मुंबईकर कोरोनाच्या बाबतीत का झालेयत एवढे निर्धास्त

ADVERTISEMENT

मुंबईत मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आहे. ज्याच्या आयुष्याचं सगळं गणित हे दैनंदिन कामावर अवलंबून आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुरुवातीला हा कामगार वर्ग घरात गपगुमान बसून राहिला होता. पण कोरोना संसर्गासोबत वाढता लॉकडाऊन आणि रोजगारावर येणारी गदा यामुळे मुंबईकराना अक्षरश: धडकी भरली. हाती नोकरी-धंदा नाही आणि नव्या रोजगाराचीही संधी नाही यामुळे मुंबईकरांची अवस्था बिकट झाली. हातवर पोट असलेल्या अनेकांनी तर गड्या आपला गावच बरा असं म्हणत गावची वाट धरली होती. या सगळ्याचा परिणाम मुंबईकरांवर मोठ्या प्रमाणात झाला.

ADVERTISEMENT

जीव धोक्यात घालून आपली पोटाची खळगी भरतायेत मुंबईकर…

ऑगस्ट 2020 पासून कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला त्यावेळी मुंबईकरांनी बेधडकपणे आपल्या कामकाजाला सुरुवात केली. लॉकडाऊनमुळे आपण काय गमावलंय याची जाणीव त्यांना झाली होती. त्यामुळे कोरोनाचं संकट समोर असून देखील आपला जीव धोक्यात घालून मुंबईकर आपली पोटाची खळगी भरत आहेत.

…म्हणून मुंबईकर वागू लागले बिनधास्त

खरं तर मुंबईकरांना थांबणं कधी माहितीच नव्हतं. पण कोरोनाने मुंबईकरांची अवस्था अतिशय दयनीय करुन टाकली. अशावेळी आपली आणि आपल्या पोटाची खळगी भरली नाही तर कोरोनाने नाही पण उपासमारीने जीव जाईल अशी त्यांची अवस्था झाली.

इकडे आड तिकडे विहिर अशा अवस्थेत असणाऱ्या मुंबईकरांनी मग कोरोनाची फारशी तमा न बाळगता आपली खळगी भरण्यासाठी ‘रिस्क’ घ्यायचं ठरवलं. इथेच खरं तर मुंबईकरांच्या मनातील कोरोनाची भीती कमी झाली. जशी रुग्णांची संख्या कमी झाली तेव्हा तर मुंबईकर हे कोरोनाबाबत खूपच बिनधास्तपणे वागू लागले होते.

गेल्या काही महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यान प्रशासनाने अनेक गोष्टींवरील निर्बंध उठवले होते. त्यामुळे कोरोना आता संपलेला आहे अशा अविर्भावात मुंबईकर वागू लागले होते. यावेळी लोकलमधील गर्दी पुन्हा वाढली असल्याचं दिसलं होतं. तर अनेक ठिकाणी गर्दीचे लोंढे दिसून आले होते. या सगळ्याचा परिणाम आता पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत.

कोरोनाचे रुग्ण गेल्या काही दिवसात एवढ्या झपाट्याने वाढत आहेत की ज्यामुळे आता आपण पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलो आहोत. महाराष्ट्रात आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ही लाट फारच मोठी असू शकते ज्यामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडू शकते. अशावेळी लॉकडाऊन हा एकच पर्याय आता प्रशासनासमोर शिल्लक राहिला आहे.

राज्यात मागील काही दिवसात 30 हजारांहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. याशिवाय राज्यात सध्या 3,03,475 एवढे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी एकट्या मुंबईत 39,869 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत मुंबईत सर्वाधिक 11,645 जणांचा मृत्यू झाला आहे. आता दुसरी लाट ही त्यापेक्षा गंभीर असू शकते त्यामुळे रुग्णांचा आणि मृतांचा आकडा वाढू शकतो. अशावेळी मुंबईकरांनी आता कोरोनाची नियम पाळणं हे अत्यंत गरजेचं झालं आहे.

कोरोना व्हायरसबाबत तुमच्या मनातले प्रश्न आणि त्यांची उत्तरं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील कालच लॉकडाऊनची तयारी करा अशा स्वरुपाचे प्रशासनाला आदेश दिले आहेत. त्यामुळे यापुढे कोणत्याही क्षणी मुंबईसह राज्यात लॉकडाऊन लागू शकतो. त्यामुळे आता तरी मुंबईकरांसह आपण सगळ्यांनी सजग होण्याची गरज आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT